Shrirampur Axe Attack: जमिनीच्या वादातून कोयत्याने हल्ला, सात आरोपींविरुद्ध गुन्हा

तन्वीर शेख गंभीर जखमी; आरोपींनी घरात तोडफोड, रोखसुद्धा काढून घेतले; श्रीरामपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला
Scythes
ScythesPudhari
Published on
Updated on

टाकळीभान: टाकळीभान येथे जमिनीच्या वादातून एकावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालूका पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Scythes
Jamkhed Gun Attack Arrest: पैलवान सागर मोहळकरवर गोळीबार प्रकरणातील आरोपी अटक

याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, तन्वीर शेख (वय 27, धंदा मजुरी, रा. घुमनदेव रोड, टाकळीभान, ता. श्रीरामपूर) हे साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे उपचारार्थ दाखल केले असताना त्यांनी आपला जबाब नोंदवला आहे. ते टाकळीभान शिवारातील वक्फ बोर्डाची जमीन कसत असून, उर्वरित जमीन बादशहा शेख (रा. टाकळीभान) हा कसतो, तन्वीर शेख यांच्या जमिनीचा ताबा बादशहा शेख याला स्वतःकडे घ्यायचा असल्याने त्यांच्यात वाद सुरू आहेत.

Scythes
Mayor Jyoti Gade Attendance Check: महापौर ज्योती गाडे यांनी कर्मचारी उपस्थिती तपासली; कामचुकारांवर कडक कारवाई इशारा

दि. 4 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तन्वीर शेख घरी असताना इमाम बादशहा शेख हा काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून तौफिक शेख, मुज्जू सय्यद आणि एक महिला यांच्यासह आला. त्यांच्या मागोमाग मोटार सायकलवरून झिशान शेख, रज्जाक शेख आणि रेहान शेख हेदेखील आले.

Scythes
Pathardi Police Allegation: वाहतूक कोंडीत पोलिसांवर वाहनांच्या काचा फोडल्याचा आरोप

त्यांनी घरासमोर उभ्या असलेल्या पत्नी व मुलांना उद्देशून आरडाओरडा करत घरात प्रवेश केला. त्यापैकी मुज्जु सय्यद याने हातातील कोयत्याने तन्वीर शेख यांच्या डोक्यात वार केला, त्यानंतर इमाम शेख याने डाव्या हाताच्या कोपराजवळ, तर महिला आरोपीने उजव्या हाताच्या मनगटावर कोयत्याने वार केले.

Scythes
Ghargaon Water Crisis: म्हसवंडीतील आदिवासी महिलांनी ग्रामसभा उधळून लावली

या मारहाणीत तन्वीर शेख गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्‌‍याने व दगडाने मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिली व कपाटातील 65 हजार रुपये रोख काढून घेतले. या धक्काबुक्की तन्वीर यांची पत्नी आसमा यादेखील किरकोळ जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news