

श्रीरामपूर : तालुक्यातील 52 पैकी 27 ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार असून 25 ग्रामपंचायती पुरुषांचा (सर्वसाधारण) ताब्यात राहणार आहेत. माळेवाडी (अनु. जमाती महिला), गुजरवाडी, खंडाळा (ना. प्र.वर्ग महिला) या तीन ग्रामपंचायतीचे आरक्षण चिठ्ठी सोडतद्वारे काढण्यात आले. (Ahilyanagar News Update)
प्रशासकीय सभागृहात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी महिला सरपंच पदाचे आरक्षण सर्व नियमांच्या आधारे काढले आहे. तालुक्यातील 52 गावातील सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती 13 पैकी 7 महिला 6 पुरुष, अनुसूचित जमाती 8 पैकी 4 ग्रामपंचायती महिला व 4 ग्रामपंचायतीत पुरुष असणार आहेत., इतर मागास प्रवर्ग 14 पैकी 7 महिला, तर 7 ग्रामपंचायत पुरुषांकडे राहतील. सर्वसाधारणला 17 पैकी 9 ग्रामपंचायती महिला, तर 8 ग्रामपंचायतीचा कारभार पाहणार आहेत.
अनुसुचित जाती ः गोवर्धनपूर, मातुलठाण (महिला), मांडवे (महिला), कुरणपूर (महिला), दत्तनगर, पढेगाव, निपाणीवडगाव, वडाळामहादेव (महिला), खानापूर (महिला), उंबरगाव, निमगावखैरी (महिला), मालुंजा बुद्रुक, लाडगाव (महिला). अनुसुचित जमाती ः खोकर, ब्राम्हणगाव वेताळ (महिला), रामपूर (महिला), भैरवनाथनगर, माळेवाडी (महिला सोडत), वळदगाव (महिला), महाकाळ वडगाव.
ना.मा.प्र. ः भामाठाण (महिला निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), एकलहरे (महिला), गुजरवाडी (महिला सोडत), हरेगाव (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), जाफ्राबाद, खंडाळा (महिला सोडत), खिर्डी, शिरसगाव, उक्कलगाव, उंदिरगाव (महिला), वांगी बुद्रुक (महिला), वांगी खुर्द, कान्हेगाव, कारेगाव (महिला)
सर्वसाधारण ः बेलापूर बुद्रुक (महिला), बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्त्याबाद, गळनिंब (महिला), घुमनदेव (महिला), गोंडेगाव (महिला), कडीत बुद्रुक, कमालपूर, माळवाडगाव, मातापूर (महिला), मुठेवडगाव (महिला), नाऊर (महिला), नायगाव (महिला), सराला (महिला). या ग्रामपंचायतीचे आरक्षण काढण्यात आले.
यावेळी माळेवाडी (अनु. जमाती महिला), गुजरवाडी, खंडाळा (ना. प्र.वर्ग महिला) या तीन ग्रामपंचायतीचे आरक्षण शालेय विद्यार्थी अभिनव सुनील कर्डिले यांच्या हाताने चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आले.