

बोधेगाव: बोधेगाव येथील श्री साध्वी बन्नोमाँ यात्रोत्सवानिमित्त आयोजति कुस्त्यांच्या जंगी हगाम्यात अंतिम लढतीत पुण्याचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू शिवराज चव्हाण याने वाशिमचा विजय शिंदे याला अस्मान दाखविले. चव्हाणला 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस देण्यात आले. (Latest Ahilyanagar News)
बोधेगाव येथील हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या श्री साध्वी बन्नोमा उत्सवात शुक्रवारी कुस्त्याचा जंगी हगामा झाला. त्यासाठी जालना, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, बीड, परभणी, सोलापूर, वाशिम, धाराशिव आदी जिल्ह्यातून नामांकित मल्लांनी हजेरी लावली. अखेरच्या मानाच्या कुस्तीमध्ये शिवा चव्हाण व विजय शिंदे यांच्यात चुरशीने कुस्ती झाली. कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, राम भोंगळे, भाऊराव भोंगळे, अशोक मासळकर, राजेंद्र शितोळे यांनी काम पाहिले.
हगाम्यासाठी यात्रा पंच कमेटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, गंगाधर घोरतळे, अभय चव्हाण, बापूराव काळे, भाऊराव भोंगळे, राम घोरतळे, सुनील जाधव, प्रसाद पवार, राम अंधारे, उपसरपंच संग्राम काकडे, राम केसभट यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शरद भालेराव यांच्या पहाडी आवाजातून बहरदार केले. त्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकले.