

नेवासा: तालुक्यातील सलाबतपूर परिसरात कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेली 13 गोवंशीय 1 लाख 45 हजारांची जनावरे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून शनिवारी (दि. 11) पहाटे ताब्यात घेऊन सुटका केली. सलाबतपूर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Ahilyanagar News)
शनिवारी पहाटे 4च्या सुमारास सलाबतपूर येथील मुझाहिज अमीर शेख याच्याकडे 10 व मोसीन शब्बीर शेख यांनी 3 असे लहान-मोठे 13 गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्याने त्यांनी सलाबतपूर परिसरात छापा टाकून या भागातील एकूण 13 गोवंशीय जनावरे वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले दिसले. या प्रकरणी मुझाहिद अमीर शेख व मोसीन शब्बीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलिस कर्मचारी पंकज व्यवहारे, सोमनाथ झाबरे, बाळासाहेब नागरगोजे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, भवर, धुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.