Shirdi Sai Baba Guru Purnima Donation: गुरुपौर्णिमेला साईचरणी भक्तांचा महासागर; तीन दिवसांत ३ लाख भाविक, ७.८१ कोटींची देणगी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद; प्रसादालयात १.९४ लाख भाविकांनी घेतले भोजन, सोने-चांदीसह कोट्यवधींची अर्पणे
Shirdi
Shirdi Pudhari
Published on
Updated on

नगर: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत तीन लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले. या तीन दिवसांच्या उत्सव काळात ७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ रुपयांची देणगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी दिली.

Shirdi
Shrigonda Police Campaign: श्रीगोंदा पोलिसांची ‘अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम’; १५ दिवसांत १४६ प्रकरणांचा निपटारा

२८ ते ३० जुलैदरम्यान श्री गुरुपौर्णिमा उत्‍सव कालावधीत सुमारे ३ लाखांहून अधिक साईभक्‍तांनी साई समाधी दर्शनाचा लाभ घेतला. श्री साईप्रसादालयात तीन दिवसांत सुमारे १ लाख ९४ हजार २८५ साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा, तर ३९ हजार ६११ अन्‍नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.

Shirdi
Shrigonda Delhi Gate: श्रीगोंद्याच्या ऐतिहासिक दिल्ली वेशीला धोका; जेसीबीने खोदकाम, वारसा संवर्धनासाठी संताप

दर्शन रांगेत १ लाख ६५ हजार २०० साईभक्‍तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्‍यात आले. उत्सव काळात ७१ लाख ७ हजार ३६० रुपये सशुल्‍क प्रसादरुपी लाडू पाकिटांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त झाले.

Shirdi
Ahilyanagar School Assault Case: अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार; मुख्याध्यापकांकडून तिसरीतील विद्यार्थ्याला मारहाण, हाताचा घेतला चावा

उत्‍सव काळात साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्‍त निवासस्‍थान, द्वारावती निवासस्‍थान, साईआश्रम भक्‍तनिवास व साई धर्मशाळा यासह अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेकरिता उभारण्‍यात आलेल्‍या मंडपात निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला. तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्‍या ३९ पालख्‍यांमधील पदयात्री साईभक्‍तांनी निवास व्‍यवस्‍थेचा लाभ घेतला, असे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.

Shirdi
Akole Municipal President Election: अकोल्यात सोनाली नाईकवाडी पुन्हा नगराध्यक्ष; ११-६ मतांनी वैष्णवी धुमाळ यांचा पराभव

अशी मिळाली देणगी

  • रोकड : २ कोटी ४ लाख ३५ हजार ५५७ (दक्षिणा पेटी)

  • देणगी : काउंटरवर १ कोटी २५ लाख ४७ हजार ९३५

  • पीआरओ देणगी : ८७ लाख १४ हजार

  • डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन, चेक, डी.डी., मनिऑर्डर : २ कोटी ७ लाख ८४ हजार ७०१ रुपये

  • परकीय चलन : ५ लाख ६५ हजार ९९१ रुपये

  • सोने ११२५.५७० ग्रॅम (मूल्य १ कोटी ४६ लाख)

  • चांदी २३७६.५०० ग्रॅम (मूल्‍य ३ लाख ९० हजार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news