Shirdi Nagar Parishad: शिर्डी नगरपरिषदेत महायुतीची पकड मजबूत; प्रतिक्षा कोते गटनेतेपदी

महायुतीच्या नगरसेवकांचा एकमताने निर्णय; विखे पाटील गटाचा महिला नेतृत्वाचा संदेश
Shirdi
ShirdiPudhari
Published on
Updated on

शिर्डी: शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने नगरपरिषदेतील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. काल झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत, महायुतीच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेविका प्रतिक्षा किरण कोते यांची एकमताने निवड करण्यात आली.

Shirdi
Sangamner Beef Seizure: संगमनेरमध्ये गोमांस जप्त; 16 गोवंशीय जनावरांना जीवदान

विखे पाटील कुटुंबाचा विश्वास सार्थ ठरवणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. कोते कुटुंबाचे पक्षाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि प्रतिक्षा कोते यांचा सुसंस्कृत व अभ्यासू चेहरा पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गटनेतेपदी एका महिलेला संधी देऊन विखे पाटील गटाने महिला सक्षमीकरणाचा संदेश दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Shirdi
Mahayuti Election Strategy: बंडखोरी रोखण्यासाठी ‘बंद पाकीट’ फॉर्म्युला; महायुतीची निवडणुकीआधी रणनीती

युवा नेतृत्व आणि विकासाची जोड

प्रतिक्षा कोते या उच्चशिक्षित असून, त्यांचे पती युवा नेते किरण कोते यांचा जनसंपर्क आणि संघटन कौशल्य शिर्डी शहरात सर्वश्रुत आहे. या दोघांच्या समन्वयातून प्रभागाचा आणि पर्यायाने शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Shirdi
MIDC investment Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यात 380 कोटींची गुंतवणूक : कृषी विद्यापीठाच्या जागेत उभारणार एमआयडीसी

गटनेतेपद मिळाल्यामुळे आता नगरपरिषदेच्या सभागृहात महायुतीची रणनीती ठरवण्याची सूत्रे प्रतिक्षा कोते यांच्या हाती असणार आहेत. युवा नेते किरण कोते यांनी गेल्या काही वर्षांत शिर्डीत केलेल्या सामाजिक कार्याची आणि जनसंपर्काची ही पोचपावती मानली जात आहे.

Shirdi
Municipal Election Nomination: उमेदवाराभोवती सूचक-अनुमोदकाच्या अटीची तटबंदी

मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखेंनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरवेन. हे पद म्हणजे केवळ मानसन्मान नसून शिर्डीकरांच्या सेवेची मोठी संधी आहे. शहरातील रस्ते, पाणी आणि स्वच्छता या प्रश्नांवर सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणे आणि शिर्डीचा कायापालट करणे, हेच माझे उद्दिष्ट राहील.

प्रतिक्षा कोते, गटनेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news