Ashok Kharat: मुख्य आरोपी अशोक खरात पोलिस ताब्यात; तपासाला वेग

पैशांचा स्रोत, सहआरोपींची भूमिका उघड होणार; समता खात्यांचाही लवकरच पर्दाफाश
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Pudhari
Published on
Updated on

नगर: शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या भोंदू अशोक खरात याला काल शिर्डी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. आज मंगळवारी त्याला राहाता कोर्टात हजर केले जाणार असून, त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे समजले. दरम्यान, शिर्डीच्या जमीन खरेदीसाठी पैसे कोणी दिले, या व्यवहारात कोण कोण सहभागी होते, याची माहिती तपासातून पुढे येणार असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

Ashok Kharat Case
Akshay Kardile Rahuri Victory: राहुरीत अक्षय कर्डिले यांचा विक्रमी विजय; भाजपचा ‘अक्षय’ जलवा कायम

भोंदू खरातचा शिर्डी पोलिसांनी सर्वप्रथम भांडाफोड केला होता. नीरज जाधव यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत दाखल केलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचे धागेदोरे खरातपर्यंत पोहचले. याच गुन्ह्याच्या तपासातून ‌‘ते‌’ व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आला आणि तपासाची दिशाच बदलली. कारवाईची कुणकुण लागताच, खरात देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र नगरच्या जिल्हा पोलिसप्रमुखांनी लुकआऊट नोटीस जारी केली. त्यामुळे त्याचा प्रयत्न फसला. त्याच दरम्यान खरातला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले. आतापर्यंत 8 पेक्षा अधिक गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार, काल शिर्डी पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेतले.

Ashok Kharat Case
Rahuri Bypoll Result Live 2026: राहुरीकरांनी दिला कौल; अक्षय कर्डिले ठरले आठवे आमदार

दरम्यान, रावसाहेब गोंदकर यांनी खरातने खासगी सावकारीतून आपली 50 कोटींची साडेचार एकर जमीन अवघ्या साडेपाच कोटींमध्ये घशात घालत फसवणूक केल्याची शिर्डी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी सावकारी कायद्यानुसार, अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात, किरण सोनवणे, अरविंद बावके, अशोक तांबे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बावके व सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. तर कल्पना खरात आणि तांबे हे पसार होते. यातील कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज राहाता न्यायालयाने फेटाळला होता. या जमीन व्यवहाराच्या दोन दिवस अगोदर खरातच्या नाशिक व सिन्नर येथील बँक खात्यात मोठ्या रकमा आल्या होत्या. संबंधितांनी याबाबत जबाब नोंदवले असले तरी यातील नेमकं तथ्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी अशोक खरात शिर्डी पोलिसांना हवा होता. तसा राहाता न्यायालयात त्यांनी मागणी केली होती. त्याला अखेर काल यश आले. नाशिकच्या आठव्या गुन्ह्याची न्यायालयीन कोठडी संपताच, त्याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. काल सायंकाळी त्याला शिर्डीत आणण्यात आले.

Ashok Kharat Case
Nevasa Car Fire: प्रवरासंगम पुलावर कार जळून खाक; पोलिस चौकी कुलूपबंद

‌‘समता‌’मधील बनावट खात्यांचाही लवकरच पर्दाफाश

अशोक खरात याला काल सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान, शिर्डीतील जमीन व्यवहाराच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याची चौकशी झाल्यानंतर त्याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले जाणार आहे. दिनेश परब याने समता पतसंस्थेत आपल्या कागदपत्रांचा दुरुपयोग करून, आपली खोटी स्वाक्षरी करून बनावट खाते उघडले, त्यावर कोट्यवधीचे व्यवहार केल्याप्रकरणी अशोक खरात व समता राहाता शाखेच्या व्यवस्थापकाविरोधात फिर्याद दिली आहे. दोघांवर गुन्हा दाखल आहे. याशिवाय अन्य खातेदारांनीही आपल्या स्वाक्षऱ्या नसल्याचे जबाब नोंदवले आहे. त्यामुळे समता पतसंस्थेतील खाते कोणाच्या आदेशाने काढण्यात आले, यात व्यवस्थापकाशिवाय कोण कोण सहभागी होते, हे पुढे येणार आहे.

Ashok Kharat Case
Puntamba Water Shortage: पुणतांब्यात गोदावरीत पाणीसाठा; उन्हाळ्यात दिलासा, तरी टंचाई कायम

दिवटे आत्महत्या प्रकरणातही खरात आरोपी?

शिर्डी संस्थानचा कर्मचारी दिवटे आत्महत्या प्रकरणातही अशोक खरात याचा आरोपीत समावेश करावा, या मागणीसाठी त्यांच्या नातेवाईकांनी शिर्डी पोलिसांसोबतच न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे जमीन फसवणूक, समता बँक खाते आणि त्यानंतर दिवटे आत्महत्या प्रकरणातही खरात याचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढू शकतो, अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news