Rahuri Bypoll Result Live 2026: राहुरीकरांनी दिला कौल; अक्षय कर्डिले ठरले आठवे आमदार

सकाळी ८ पासून मतमोजणी; दुपारपर्यंत निकालाची शक्यता
Akshay Kardile
Akshay KardilePudhari
Published on
Updated on

राहुरीकरांचा कौल

1,04,485 मतांनी आघाडीवर राहून अक्षय कर्डिले यांनी 1,22,146 मतांनी विजय मिळवत राहुरी विधानसभेचे आठवे आमदार झाले. मतदारांचे आभार मानत अक्षय कर्डिले कार्यकर्त्यांसोबत जल्लोषात सहभागी झाले.

अक्षय कर्डिलेंची विजयाच्या दिशेनेे वाटचाल

24 व्या फेरीत अक्षय कर्डिले 96,645 मतांनी आघाडीवर राहुन 1,22,146 मतं

23 वी फेरी पुर्ण

राहुरीकरांचे अक्षय कर्डिलेंना 1,15,855 मतं

86,253 मतांनी अक्षय कर्डिले आघाडीवर

22 व्या फेरीत अक्षय कर्डिलेंना 1,09,712 मतं

अक्षय कर्डिले विजयाच्या दिशेनेे

20 व्या फेरीत 99,225 मतं

अक्षय कर्डिलेंची घोडदौड

93,889 मतांनी आघाडीवर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण

एकूण मतं 94,984

19 वी फेरी पुर्ण

90,638 मतांनी अक्षय कर्डिले आघाडीवर

अक्षय कर्डिले आघाडीवर

भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले 17 व्या फेरीत 85,735 आघाजीवर

16 फेरा पुर्ण

80,411 मतांनी अक्षय कर्डिले आघाडीवर

बारावी फेरी पुर्ण

अक्षय कर्डिले 50,273 मतांनी आघाडीवर

अक्षय कर्डिलेंची आघाडी कायम

अकराव्या फेरी अखेर अक्षय कर्डिलेंना 55,767 मतं

10 व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले आघाडीवर

भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिलेंना 49,956 मतं

आठवी फेरी पुर्ण

अक्षय कर्डिले 39,645 मतांनी आघाडीवर

राष्ट्रवादीचे (शप) गोविंद मोकाटेंना 5,401 मतं

राहुरीत सहा फेऱ्या पुर्ण

अक्षय कर्डिले 25,486 मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी

  • अक्षय कर्डीले :- 20849

  • गोविंद मोकाटे :- 2726

  • अक्षय कर्डीले :- 18,123 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

  • भाजप अक्षय कर्डिले - 16852

  • राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

  • वंचित संतोष चोळके- 1022

  • अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

  • तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

नगर/राहुरी: राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.4) जाहीर होणार असून, ‌‘राहुरी‌’च्या आमदारपदी आठवी व्यक्ती कोण असणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यान, मतमोजणीचे नियोजन पूर्ण झाले असून, सकाळी 8 वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी 8.45 वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची 23 एप्रिल 2026 रोजी पोटनिवडणूक झाली. 3 लाख 33 हजार 545 मतदारांपैकी 1 लाख 86 हजार 405 मतदारांनी मतदान केले. सरासरी 55.88 टक्के मतदान झाले आहे. मतदान झाल्यानंतर 11 दिवसांनी राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी 4 मे रोजी राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयात होणार आहे. निवडणूक यंत्रणेकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.

मतमोजणीसाठी एकूण 20 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 14 टेबलांवर ईव्हीएममधील मतांची, 2 टेबलांवर पोस्टल मतांची तर 4 टेबलांवर लष्करी जवानांची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी एका टेबलवर चार याप्रमाणे एकूण 110 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 371 मतदान केंद्रांवर 1 लाख 86 हजार 405 मतदान झाले आहे. हे मतदान 14 टेबलांवर मोजले जाणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहेत.

सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल 8.35 ते 8.45 दरम्यान जाहीर होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव यांनी म्हटले. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यत राहुरी मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतमोजणीसाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर राहुरी मतदारसंघाचे आतापर्यत बाबूरावदादा तनपुरे, पी.बी. कडू, का.ल. पवार, प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, शिवाजीराव कर्डिले व प्राजक्त तनपुरे आदी सात व्यक्तींनी विधानसभेत प्रतिनिधीत्त्व केले आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यासह सात उमेदवारांच्या भवितव्याचा सोमवारी (दि.4) निर्णय होत आहे. या सात उमेदवारांपैकी आता कोणती आठवी व्यक्ती विधानसभेत पोहोचणार आहे याची उत्सुकता राहुरीकरांना लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news