Ashok Kharat Shirdi Land Scam: शिर्डीत 50 कोटींच्या जमिनीचा घोटाळा; भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप

साडेपाच कोटींमध्ये व्यवहार; गोंदकर कुटुंबाची पोलिसांकडे धाव, चौकशी सुरू
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Pudhari
Published on
Updated on

नगर: भोंदू अशोक खरात याने फक्त महिलांचेच शेोषण केले नाही, तर त्याने भोळ्याभाबड्या लोकांनाही गंडा घातल्याच्या तक्रारी आहेत. अशोक खरात याने शिर्डी शहरातील मोक्याची 50 कोटींची जमीन अवघ्या साडेपाच कोटींमध्ये घशात घातल्याची तक्रार पोलिसांपर्यंत पोहचली आहे. गहाण म्हणून देण्यात आलेल्या या जमिनीचे खरेदीखतात दाखवलेली साडेपाच कोटीची रक्कमदेखील संबंधित मूळ मालकाला अद्याप मिळाली नसल्याचा आरोप गोंदकर कुटुंबाने केला आहे.

Ashok Kharat Case
Nilesh Lanke Rajnath Singh Meeting: खासदार नीलेश लंके यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी भेट; माजी सैनिक व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा

ते कुटुंब आजही पत्र्याच्या घरात अन्‌‍ अंधारात, हालाखीचे जीवन जगत असल्याचे पुढे आले आहे. अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची शुक्रवारी भेट घेऊन शिर्डीतील या गोंदकर कुटुंबाने आपल्या व्यथा मांडल्या. आता पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू असल्याचे समजते. भोंदू खरातचे शिर्डी परिसरात आजोळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याचे शिर्डीत येणे-जाणे होतेच. शिवाय त्याचा भक्तपरिवारही मोठा होता.

Ashok Kharat Case
Pathardi Panchayat Samiti: पाथर्डी पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना

यात महिलांचाच भरणा अधिक होता, अशीही माहिती पुढे येत आहे. त्याने महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतलाच, शिवाय स्थानिक अंधभक्तांच्या मदतीने जमिनीही लुबाडण्याचेही उद्योग केल्याची पहिली तक्रार पुढे आली आहे. शिर्डीतील ‌‘पंचतारांकित हॉटेल‌’ परिसरातील सुमारे 4 एकर जमीन रावसाहेब गोंदकर यांच्या मालकीची होती. मात्र, साधारणतः अडीच वर्षांपूर्वी म्हणजे 2023 मध्ये या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे 50 कोटींची ही जमीन अवघ्या साडेपाच कोटींना अशोक खरातने नावावर करून घेतल्याचे दिसते आहे.

Ashok Kharat Case
Child Marriage Case: १४ वर्षीय मुलीचा बालविवाह उघड; आई-वडिलांसह सहा जणांवर गुन्हा

साडेपाच कोटीही दिले नाहीत?

शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांची आई व पत्नी यांनी शुक्रवारी (दि. 27) श्रीरामपूरचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेत व्यथा मांडल्या. त्यांनी जमिनीची कागदपत्रेही सोबत नेली होती. यात, संबंधित चार एकर जमिनीची पक्की खरेदी झाल्याचे दिसून आले. ही खरेदी 2023 मध्ये, साडेपाच कोटींना झाल्याचेही दाखवले आहे. मात्र, आमची जमीन 50 कोटींची असून, ती साडेपाच कोटींमध्ये कशी विकली जाऊ शकते. आम्हाला दोन वर्षांसाठी जमीन गहाण असल्याची कुणकुण होती; मात्र आम्हाला अंधारात ठेवून आणि कोणतेही पैसे न देता हा गैरव्यवहार ‌‘सोनवणे‌’ भोंदूभक्ताने केला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे हा सोनवणे कोण, याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, जर साडेपाच कोटीही मिळाले असते तर संबंधित कुटुंब आज पत्र्याच्या घरात आणि अंधारात राहिले असते का, असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

Ashok Kharat Case
Petrol Diesel Sale Ban: पेट्रोल-डिझेल उघड्यावर विक्रीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश

संगमनेरात मुलीच्या नावावर प्रॉपर्टी

भोंदू खरात याची नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यात, शिर्डीसह परिसरातही मोठी प्रॉपर्टी असल्याचे तपासातून समजले आहे. यामध्ये शिर्डीत चार एकर जमीन, काकडी विमानतळ परिसरात 5.5 एकर, संगमनेरात मुलीच्या नावावर 11 गुंठे प्लॉट, तसेच शिर्डीत एका नामांकित मंगल कार्यालयात अशोक खरात पार्टनर असल्याचेही दिसले आहे. शिर्डीतील चार एकर जमिनीचा व्यवहार पाहता यात गडबड असल्याचे दिसते आहे. त्यामुळे इतर प्रॉपर्टीच्या खरेदीखतांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news