Nilesh Lanke Rajnath Singh Meeting: खासदार नीलेश लंके यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी भेट; माजी सैनिक व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा

ईसीएचएस सुविधा, पेन्शन, बांधकाम निर्बंध आणि कापूरवाडी तलाव गाळप्रश्नी केंद्राकडे पाठपुरावा
Nilesh Lanke Rajnath Singh Meeting
Nilesh Lanke Rajnath Singh MeetingPudhari
Published on
Updated on

पारनेर : खासदार नीलेश लंके यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची नवीदिल्ली येथे भेट घेऊन मतदारसंघाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली.

खासदार लंके यांनी माजी सैनिकांना माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला. नगर येथील माजी सैनिक संतोष जगन्नाथ पिसे यांना डायलिसिससारख्या अत्यावश्यक उपचारासाठी संबंधित रुग्णालयाने ईसीएचएस अंतर्गत सेवा देण्यास नकार दिल्याची बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकारामुळे संबंधित

Nilesh Lanke Rajnath Singh Meeting
Pathardi Panchayat Samiti: पाथर्डी पंचायत समितीचा वीजपुरवठा खंडित; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना

रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, अशा समस्या इतर माजी सैनिकांनाही भेडसावत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, मृत सैनिक योगेश बापूराव शिर्के यांच्या पत्नीच्या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला पेन्शनचा लाभ देणे अथवा शासकीय सेवेत पुनर्वसन करण्याची मागणी लंके यांनी केली.

Nilesh Lanke Rajnath Singh Meeting
Child Marriage Case: १४ वर्षीय मुलीचा बालविवाह उघड; आई-वडिलांसह सहा जणांवर गुन्हा

याशिवाय, नगर व राहुरी तालुक्यांतील सैन्य क्षेत्रालगतच्या गावांमध्ये बांधकामासाठी अन-आपत्ती प्रमाणपत्र संदर्भातील परिपत्रकांमधील विरोधाभासामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा मुद्दा त्यांनी मांडला. 2011 व 2016 मधील परस्परविरोधी आदेशांमुळे स्थानिक प्रशासन व सैन्य अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या मालकी हक्कांवर या निर्बंधांचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत, त्यांच्या वैध हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणीही लंके यांनी केली.

Nilesh Lanke Rajnath Singh Meeting
Petrol Diesel Sale Ban: पेट्रोल-डिझेल उघड्यावर विक्रीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश

नगर स्टेशन मुख्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या कापूरवाडी तलावात साचलेला गाळ काढण्याची मागणी करण्यात आली. या तलावातील गाळामुळे जलसाठा कमी झाला असून, तो काढल्यास परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळू शकतो, असे लंके यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व मुद्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news