Ashok Kharat: शिर्डी फसवणूक प्रकरण: अशोक खरात याच्याविरोधात तपास अधिक तीव्र

संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बँक खात्यांमुळे पोलिस तपासाला वेग आला आहे
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case Pudhari
Published on
Updated on

नगर: शिर्डीतील फसवणूक व सावकारकीच्या गुन्ह्यातील आरोपी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिन अर्जावर शुक्रवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली. आता 16 तारखेला त्यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान खरात नॉमिनी असलेल्या खात्यांबाबत पोलिसांनी मागविलेल्या माहितीला तीन पतसंस्थांनी प्रतिसाद दिला नाही. आता सोमवारी पोलिस थेट या संस्थेत धडकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Ashok Kharat Case
Ahilyanagar Police Action: अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; गोवंश कत्तल प्रकरणातील 6 टोळ्या हद्दपार

शिर्डी पोलिसात दाखल गुन्ह्यात आरोपी असलेल्या कल्पना अशोक खरातने राहाता न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. आत खरातचे वकिल उपस्थित राहू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

Ashok Kharat Case
Ahilyanagar Unseasonal Rain Crop Loss: अहिल्यानगरात अवकाळी पावसाचा फटका; गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान

समता पतसंस्थेतील शंभर खात्यांना भोंदू अशोक खरात नॉमिनी असून त्याने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले आहेत. ज्यांच्या खात्यावरून व्यवहार झाले त्यांनी त्याच्याशी संबंध नाकारत खरातकडे अंगुलीनिर्देश केल्याने पोलिसांनी त्या व्यवहाराची चौकशी सुरू केली.

Ashok Kharat Case
Women Safety Complaint: ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक सक्षम; सार्वजनिक ठिकाणच्या छळाविरोधातही तक्रार शक्य

दरम्यान राहातामधील स्वामी विवेकानंद पतसंस्था, बुलढाणा अर्बन, संत नागेबाबा आणि राहाता पिपल्समध्येही खरातशी संबंधित खाते असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी या चारही संस्थांना पत्र पाठवत माहिती मागविली, पण यातील विवेकानंद वगळता इतर तीन संस्थांनी पोलिसांच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता सोमवारी पोलिस थेट या संस्थेत जावून माहिती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Ashok Kharat Case
Ahilyanagar Fake Astrologer: अहिल्यानगरमध्ये भोंदू भविष्यकारांचा पर्दाफाश; वृद्धांकडून अंगठ्या लंपास करणारे दोघे जेरबंद

खरातच्या खात्यावर डिपॉझिट करणारे लोकेट!

दरम्यान खरातच्या सिन्नर बँक ऑफ बडोदा आणि नाशिकच्या युनियन बँकेतील तीन खात्यावर दोन वर्षात प्रत्येकी 7 कोटीचे ट्रान्झक्शनद्वारे 21 कोटीचे डिपॉझिट आरटीजीएसद्वारे झाल्याचे तपासात समोर आले. याची माहिती पोलिसांनी घेतली. यातील आरटीजीएस करणाऱ्यांची नावे पोलिसांच्या हाती लागली असून त्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता त्यांनी डिपॉझिट कशासाठी केले, उद्देश काय? याचा तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news