Shirdi Saibaba Temple: साईचरणी सोन्याचे ताट, चांदीचे अगरबत्ती स्टॅण्ड, त्रिशूल; सलग सुट्टयांनी शिर्डीत भाविकांचा ओघ

Shirdi Saibaba Temple Latest News: श्री साईचरणी 191.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट आणि 283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड अर्पण
Ahilyanaagar News
Shirdipudhari
Published on
Updated on

Shirdi Saibaba Temple Donation

शिर्डी : सलग सुट्टयांनी शिर्डी साईभक्तांची फुलली आहे. हैद्राबाद (तेलंगाणा) येथील साईभक्त डॉ. जी. हरीनाथ आणि श्रीमती जी. पुष्पलता यांनी श्री साईचरणी 191.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट आणि 283 ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड असा 17 लाख 73 हजार 834 रुपये किमतीच्या वस्तू अर्पण केल्या. संस्थानचे तत्कालीन संरक्षण अधिकारी आण्णासाहेब बन्सी परदेशी यांनी त्यांचा मुलगा व मुलगी दोघांनाही शासकीय सेवेत नोकरी मिळाल्यामुळे साईचरणी 36.200 ग्रॅम वजनाचा सोन्याचा त्रिशुळ अर्पण केला. (Ahilyanagar Latest News)

देणगी प्राप्त झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून परदेशी यांनी 3 लाख 31 हजार रुपयांचा साडेतीन तोळ्याचा त्रिशुळ अर्पण केला. स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी आणि रविवार अशी सलग सुट्टी असल्याने शिर्डी भाविकांनी फुलली आहे.

Ahilyanaagar News
Ahilyanagar Robbery: एकाच रात्री 3 वाहनचालकांना लुटले

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने शुक्रवारी शिर्डीमध्ये देशभक्तीपर व देशप्रेमावर अनेक कार्यक्रम झाले. तसेच शासकीय कार्यालय, शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळाष्टमीनिमित्त शनिवारी हजारो भक्तांनी शिर्डीतील दहीहंडीचा उत्सव अनुभवला. साईबाबा समाधी मंदिरात रात्री हभप स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्णजन्म कीर्तन झाले. श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्णु थोरात, पुजारी, साईभक्त उपस्थित होते. त्यानंतर श्रींची शेजारती झाली.

Ahilyanaagar News
Diesel Theft: डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; तिघे अडकले जाळ्यात

शनिवारी सकाळी श्री गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडप स्टेजवर हभप स्मिता आजेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्य पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. रात्री गोकुळाष्टमीनिमित्त श्रींच्या रथाची गावातून मिरवणुक काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news