Shevgaon Nagar Parishad: शेवगाव नगरपरिषदेत पहिली सर्वसाधारण सभा; उपनगराध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेच

उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण? पहिल्याच सभेत सत्तासमीकरणाची कसोटी
Shevgaon Nagar Parishad
Shevgaon Nagar ParishadPudhari
Published on
Updated on

बोधेगाव: नुकत्याच पार पडलेल्या शेवगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. 15) दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत उपनगराध्यक्षपदाची निवड, तसेच नामनिर्देशित सदस्य (स्वीकृत नगरसेवक) नियुक्तीची प्रक्रिया पार पडणार आहे. सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष माया अरुण मुंडे कामकाज पाहणार आहेत.

Shevgaon Nagar Parishad
Ahilyanagar Solar Pump Scheme Fraud: चिचोंडी शिराळमध्ये सोलर पंप योजनेचा बट्ट्याबोळ; शेतकऱ्यांची वर्षभर फसवणूक

उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत नामनिर्देशन अर्ज सादर करायचे आहेत. दुपारी 12 वा. अर्जांची छाननी होणार आहे. गरज भासल्यास तत्काळ मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

Shevgaon Nagar Parishad
Rahuri Assembly By Election: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू; मतदार यादीवर हरकती-दावे मागविले

नगरपरिषदेमधील पक्ष किंवा गटांच्या संख्याबळानुसार कमाल 3 स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी संबंधित पक्ष, गट व आघाडी प्रमुखांनी बुधवारी (दि. 14) दुपारी 12पर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. त्याच दिवशी अर्जांची अधिकृत छाननी होणार आहे.

Shevgaon Nagar Parishad
Sangamner Crime Drugs Protest: संगमनेरमध्ये अमली पदार्थ व गुन्हेगारीविरोधात महिलांचा संताप

राजकीय रणधुमाळीला सुरुवात

उपनगराध्यक्ष पदासाठी नवनियुक्त नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप यांच्यात बैठक झाल्याने उपनगराध्यक्ष कोण होणार, याबाबत शहरात प्रचंड उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, सत्ताधारी शिंदे गट शिवसेनेकडे केवळ 3 नगरसेवक असल्याने आवश्यक संख्याबळ नसताना ते काही राजकीय चमत्कार घडवतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shevgaon Nagar Parishad
Ahilyanagar Municipal Election Postal Voting: कर्मचाऱ्यांना 13 जानेवारीला टपाली मतदानाची संधी

स्वीकृत नगरसेवकांवर खमंग चर्चा

स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने निवडणुकीत थांबलेले व पक्षश्रेष्ठींनी शब्द दिलेले कार्यकर्ते यांची पंचाईत होण्याची शक्यता आहे.पहिली सर्वसाधारण सभा शेवगावच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी ठरणार असून, उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक कोण होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news