Rahuri Assembly By Election: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू; मतदार यादीवर हरकती-दावे मागविले

6 ते 24 जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारणार; मतदान केंद्रांची संख्या वाढून 374 वर पोहोचली
Election Voter List
Election Voter ListFile Photo
Published on
Updated on

राहुरी: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू झालेली आहे. स्व.आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी पद रिक्त असल्याने संबंधित पदाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहिर करण्यात आलेली आहे. दि.6 ते 24 जानेवारीपर्यंत हरकती व दावे नोंदविले जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अमित पवार यांनी दिली आहे.

Election Voter List
Ahilyanagar Highway Accidents: नगर–छत्रपती संभाजीनगर, मनमाड महामार्ग ठरले मृत्यूमार्ग; वर्षभरात 254 जणांचा बळी

तहसीलदार डॉ. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 जानेवारी रोजी प्रारुप यादी छायाचित्रासह प्रकाशित करण्यात आलेली आहे. संबंधित मतदार यादीबाबत काही हरकत किंवा दावा दाखल करण्यासाठी दि. 24 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. राहुरी महसूल विभागाच्या निवडणूक शाखेकडे तक्रार किंवा दावा नोंदविता येणार आहे. दावे व हरकतीबाबत दि. 7 फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडून निर्णय जाहिर केला जाणार आहे. प्रशासनाकडून दावे व हरकती निर्गती दि. 14 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Election Voter List
Pathardi Land Dispute Firing: पाथर्डीतील काटेवाडीत जमिनीच्या वादातून हिंसक संघर्ष; हवेत गोळीबार

मागिल सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळ 3 लक्ष 24 हजार 59 इतके मतदार होते. त्यानुसार वाढलेल्या मतदानानुसार 67 नविन मतदान केंद्र नव्याने असणार आहे. पूर्वी 307 मतदान केंद्र असताना आता राहुरी विधानसभा मतदान केंद्रासाठी 374 मतदान केंद्र असणार असल्याचे निवडणूक प्रशासनाने जाहिर केलेले आहे. त्यामुळे वाढत्या मतदानाचा टक्का पाहता पोटनिवडणुकीसाठी राजकीय तर्क वितर्क सुरू झालेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news