Shevgaon Crime: शेवगावमध्ये १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीचे नाव वगळल्याचा फिर्यादीचा आरोप

स्कॉर्पिओतून मुलीला पळवून नेल्याची तक्रार; पोक्सो कायद्यानुसार गुन्हा, निष्पक्ष तपास आणि कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी
assault case
assault casepudhari photo
Published on: 
Updated on: 

शेवगाव: शेवगाव तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे भररस्त्यातून अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यानुसार गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

assault case
Ahilyanagar Voter Registration: अहिल्यानगर जिल्ह्यात मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद; ८२ हजारांहून अधिक दावे-हरकती दाखल

याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी ः गेल्या ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पीडित मुलगी प्रकृती अस्वस्थ असल्याने वैद्यकीय उपचारासाठी पायी जात होती. यावेळी स्वामी समर्थ मंगल कार्यालयासमोर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून आलेल्या काही जणांनी तिचा रस्ता अडवून तिला जबरदस्तीने फूस लावून वाहनांमध्ये पळून नेले.

assault case
Ahilyanagar Water Restrictions: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेचा कठोर निर्णय; वॉशिंग सेंटर, बांधकामांना पिण्याचे पाणी बंद!

बाबत शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी आढळून आल्याने तिच्या जबाबवरून अक्षय बोरुडे (रा. तिसगाव), हनुमंत गोल्हार यांच्या विरुद्ध पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ३, ४ आणि ६ अंतर्गत वाढीव कलमे लावण्यात आली आहेत

assault case
Akole Black Magic Cases: अकोले तालुक्यात जादूटोण्याचे प्रकार वाढले; पोलिस ठाण्यांतील अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कागदावरच!

या संपूर्ण प्रकरणाचा निःष्पक्ष आणि पारदर्शक तपास करण्यात यावा, वाढीव कलमांच्या अहवालातून तक्रारी मधून वगळण्यात आलेल्या आरोपीची सखोल चौकशी करून पुराव्यांनुसार कारवाई करावी, तसेच पीडित कुटुंबीयांना तातडीने पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी फिर्यादीने जिल्हा पोलिस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या या गंभीर प्रकरणातील सर्व संबंधितांची निःष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबांनी केली आहे.

assault case
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी चुरशीने मतदान; आज निकालाचा फैसला!

एका आरोपीचे नाव वगळल्याचा आरोप

या प्रकरणात मूळ तक्रार आणि जबाबामध्ये आणखी एकाचे नाव नमूद असतानाही वाढीव कलमांच्या अहवालातून त्याचे नाव वगळण्यात आल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तपासाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, अशी शंका फिर्यादीने व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.