Ahilyanagar Voter Registration: अहिल्यानगर जिल्ह्यात मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद; ८२ हजारांहून अधिक दावे-हरकती दाखल

नवीन मतदार नोंदणीसाठी ५३ हजार ६३७ अर्ज; निवडणूक आयोगाकडून १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ, अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबरला
Voter registration SIR rules
Voter registration SIR rules
Published on: 
Updated on: 

नगर: प्रसिध्‍द प्रारुप मतदारयादीवर ३० ऑक्‍टोबरपर्यंत जिल्‍हाभरातून ८२ हजार २३२ दावे व हरकती दाखल झालेल्‍या असून, यामध्‍ये ५३ हजार ६३७ नवीन मतदारनोंदणीसाठी दाखल अर्जांचा समावेश आहे. दरम्‍यान, निवडणूक आयोगाने आता १३ नोव्‍हेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करण्‍यास मुभा दिली आहे. मुदतवाढ दिल्‍याने अंतिम मतदारयादी १६ नोव्‍हेंबरऐवजी आता ३० नोव्‍हेंबर रोजी प्रसिध्‍द होणार आहे.

Voter registration SIR rules
Ahilyanagar Water Restrictions: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेचा कठोर निर्णय; वॉशिंग सेंटर, बांधकामांना पिण्याचे पाणी बंद!

मतदारयादी पूर्णपणे बिनचूक आणि पारदर्शक तयार करण्‍यासाठी भारत निवडणूक आयोगाच्‍या वतीने जिल्‍हाभरात मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम (एसआयआर) राबविण्‍यात आली. त्‍यासाठी बीएलओंनी घरोघरी जात मतदारांकडून गणना प्रपत्र प्राप्‍त केले.

Voter registration SIR rules
Akole Black Magic Cases: अकोले तालुक्यात जादूटोण्याचे प्रकार वाढले; पोलिस ठाण्यांतील अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कागदावरच!

दरम्‍यान, अर्ज उपलब्‍ध न झालेल्‍या जिल्‍हाभरातील जवळपास ४ लाख २६ हजार मतदारांना वगळून जिल्‍हा निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारसंख्‍या असलेली प्रारुप मतदारयादी ३१ ऑगस्‍ट रोजी प्रसिध्‍द केली. या यादीवर ३० सप्‍टेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करण्‍याची संधी दिली होती. दरम्‍यान, आयोगाने १२ ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्‍यानंतर आयोगाने पुन्‍हा या कार्यक्रमास मुदतवाढ दिली आहे. त्‍यानुसार नागरिकांना आता १३ नोव्‍हेंबरपर्यंत मतदारनोंदणी करता येणार आहे.

Voter registration SIR rules
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी चुरशीने मतदान; आज निकालाचा फैसला!

जिल्‍हाभरातून नवीन मतदारनोंदणीसाठी ३० ऑक्‍टोबरपर्यत एकूण ८२ हजार २३२ दावे व हरकती प्राप्‍त झाल्‍या आहेत. यामध्‍ये वगळणीसाठी ४ हजार ८४९ व दुरुस्‍तीसाठी २३ हजार ७४६ तर नवीन नोंदणीसाठी ५३ हजार६३७ अर्जांचा समावेश असल्‍याचे उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.

Voter registration SIR rules
Sangamner Drought: संगमनेर तालुक्यात दुष्काळाचे संकट गडद; ४४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

नवमतदारनोंदणी अर्ज संख्‍या

अकोले : ३७२२, संगमनेर : ६९०२, शिर्डी : ४४२०,

कोपरगाव : ३४२८, श्रीरामपूर : ४१९०, नेवासा : ३१२५,

शेवगाव : ५८२५, राहुरी :२८५५, पारनेर : ६४१६,

अहमदनगर शहर : ३९७३, श्रीगोंदा : ३९७८, कर्जत-जामखेड : ४८०३.