Akole Black Magic Cases: अकोले तालुक्यात जादूटोण्याचे प्रकार वाढले; पोलिस ठाण्यांतील अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कागदावरच!

महिनाभरात दोन घटनांप्रकरणी १२ जणांवर गुन्हे; स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी
Black Magic Fraud
Black Magic FraudPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

अकोले: जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापण्याचे आदेश दिले होते. मात्र, बहुतांश पोलिस ठाण्यात याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे चित्र आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन नसले तरी त्यादृष्टीने पोलिस कामे करीत आहेत. भोंदू खरात प्रकरणानंतर शासनाला कक्ष स्थापन करण्याची आठवण झाली आहे.

Black Magic Fraud
Ahilyanagar District Bank Election: जिल्हा बँकेच्या १० जागांसाठी चुरशीने मतदान; आज निकालाचा फैसला!

दरम्यान, तालुक्यात राजूर, शेडी परिसरात महिनाभरात अघोरी पूजा करून पैशाचा पाऊस व खड्डा खणून साहित्यासह अघोरी पुजा, अशा दोन घटनांमध्ये १२ जणांवर गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा समाजातील अंधश्रद्धा, काळी जादू आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या अघोरी प्रथांना रोखणारा एक क्रांतिकारी कायदा आहे. २६ ऑगस्ट २०१३ रोजी अमलात आलेल्या या कायद्याचा मुख्य उद्देश वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि नागरिकांचे शोषण थांबवणे हा आहे.

Black Magic Fraud
Sangamner Drought: संगमनेर तालुक्यात दुष्काळाचे संकट गडद; ४४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

महिन्याभरात दोन गुन्हे दाखल

राजूर शहरातील भरवस्तीत जुन्या पडक्या इमारतीतमध्ये व मोकळ्या जागेत सोन्याची पेटी, धन काढण्यासाठी जडीबुटीचा वापर करत जादूटोणा करणाऱ्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. तसेच राजूरमध्ये अघोरी पूजा करून पैशाच्या पावसाचे आमिष दाखवणाऱ्या भोंदू लेडे यांच्यासह चार जणाचा पर्दाफाश झाला. तर शेंडी (गावठाण) येथे मंगळवारी रात्रीच्या अंधारात एका शेतात ज्ञानेश्वर लेंडेसह सात जणांनी खड्डा खणून साहित्यासह अघोरी पुजा करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, राजूर परिसरात ३ गुन्हे दाखल झाले असून यामध्ये १७ जणांना अटक केली होती.

Black Magic Fraud
Shrirampur Water Shortage: श्रीरामपुरात पाणीटंचाईचा गैरफायदा; बोअरवेल खोदाईचे दर दुप्पट-तिप्पट!

कक्ष स्थापन करण्याचे आदेश

महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांपेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करणे अपेक्षित आहे. या अधिकाऱ्यास कोणत्याही ठिकाणी प्रवेश करणे, झडती घेणे इत्यादी अधिकार आहेत. तसेच तक्रार निवारणार्थ स्वतंत्र कक्ष स्थापन असणे गरजेचे आहे.

Black Magic Fraud
Ahilyanagar Rabi Sowing: अहिल्यानगरमध्ये दुष्काळातही रब्बीच्या पेरणीला वेग; ३९ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण!

स्वतंत्र कक्षाची आवश्यकता

प्रत्येक पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या दामिनी पथकाकडून तसेच पोलिसांकडून याबाबत दक्षता घेतली जात आहे. भोंदूबाबा आणि अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात कडक कायदे, जनजागृती आणि सामाजिक सतर्कता या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. २०२६ मधील एका महिन्यात राजूर, शेंडी परिसरात जादूटोणाच्या दोन घटना पाहता, नागरिकांच्या सर्तकेमुळे घटना उघडकीस आल्याने लोक आता जागरूक होत असून अशा बुवाबाजी विरोधात पावले उचलत आहेत. मात्र, अजूनही भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा निर्मूलन होताना दिसत नाही.

नुकतेच अकोले तालुक्यात अंधश्रद्धेतून भोंदू बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका महिलेला फसवण्याची घटना व भोंदू बाबांचा वाढता सुळसुळाट अशा अतिशय वेदनादाई घटना घडून अज्ञानाचा फायदा घेत शोषण करण्याचे प्रकार उघडकीस येऊनही काही बुवाबाबा राजरोसपणे आपले दुकान थाटून अंधश्रद्धा फोफावताना दिसत आहेत. पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार अशा लोकांवर कारवाई करायला हवी. तसेच राज्य शासनाने लागू केलेल्या जादूटोणा प्रतिबंधक कायदा जागृती होण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारायला हवा.

सतीश पाचपुते, अध्यक्ष, अंनिस, अकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.