Rashin Hoarding Accident: राशीनमध्ये वादळी वाऱ्यात लोखंडी होर्डिंग कोसळून तरुणाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

अवकाळी पावसात घडलेल्या दुर्घटनेने हळहळ; अनधिकृत होर्डिंगबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू
Death Case
Death Case Pudhari
Published on
Updated on

कर्जत: तालुक्यातील राशीन येथे रविवारी (दि. 31) रात्री अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे लोखंडी होर्डिंग कोसळून अमित मोहन सुकाळे (वय 24, रा. राशीन) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे समजते.

Death Case
Ahilyanagar Storm: वादळी पावसाचा अहिल्यानगरला तडाखा; 40 ठिकाणी झाडे कोसळली, रात्रभर वीजपुरवठा विस्कळीत

या प्रकरणी विकास लहू सायकर याच्याविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशीन येथील महात्मा फुले चौक परिसरात उभारलेल्या मोठ्या लोखंडी होर्डिंगवर एका कार्यक्रमाचे बॅनर लावले होते.

Death Case
Ahilyanagar Local Bodies Election: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नाट्यमय घडामोडी; एबी फॉर्म असूनही काँग्रेस उमेदवाराचा अर्ज थांबला

रविवारी रात्री जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने बॅनर फाटू नये म्हणून अमित सुकाळे याला होर्डिंगवर चढून बॅनरला छिद्रे पाडण्यास सांगण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. बॅनरला छिद्रे पाडल्यास वाऱ्याचा दाब कमी होईल आणि बॅनर फाटणार नाही, असे सांगण्यात आल्याने अमित होर्डिंगवर चढला.

Death Case
Maharashtra Onion Farmers Protest: पारनेरमध्ये कांदा लिलाव बंद; नाफेड दर निर्णयावर शेतकऱ्यांचा संताप

मात्र त्याच वेळी वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आणि संपूर्ण होर्डिंग कोसळले. त्याखाली सापडून अमितचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचे नातेवाईक राजू दौलत मोरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून विकास लहू सायकर याच्याविरुद्ध पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला आहे.

Death Case
Pathardi Crime: पाथर्डी धक्कादायक घटना; सासू-सासऱ्यांच्या जाचामुळे जावयाचे उचले टोकाचे पाऊल

या होर्डिंगसाठी संबंधितांची अधिकृत परवानगी होती का, याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक मुलानी यांनी दिली. चौकशीदरम्यान आणखी काही व्यक्तींची जबाबदारी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news