Shop Owners Notice: आणखी 52 गाळेधारकांना जप्ती नोटिसा

जुना दाणे डबरातील गाळेधारकांकडे दोन कोटी थकबाकी
ahilyanagar
भाग्योदय-बालाजी कॉलनीतील वीस गाळेधारकांना नोटिसा Pudhari
Published on
Updated on

नगर: गंज बाजार, सर्जेपूरातील रंगभवन, सिध्दीबाग, प्रोफेसर चौक, सावित्रीबाई फुले फेज 1 व फेज 2, भाग्योदय बालाजी कॉलनी व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्यानंतर आता मध्य शहरातील बाजारपेठेत असलेल्या जुना दाणे डबरातील 52 गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. या गाळेधारकांकडे 2 कोटी 7 लाखांची थकबाकी असून, त्याच्या वसुलीसाठी सर्वांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत.

संपूर्ण थकबाकी तत्काळ न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेतले जातील, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. शहरातील गाळेधारकांकडे महापालिकेची सुमारे 25 कोटींची थकबाकी आहे. मार्च महिन्यात महानगरपालिकेने थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्यासाठी नोटीसा बजावल्या होत्या. (Latest Ahilyanagar News)

ahilyanagar
Shrirampur Firing: श्रीरामपुरात गोळीबार; हल्लेखोर पसार

त्यानंतर शहरातील सर्व गाळे, खुल्या जागा, वर्ग खोल्या आदींचा सर्वे मार्केट विभागाकडून करण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने सर्वच गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

दाणे डबरातील गाळेधारकांचे बहुतांश करारनामेही संपुष्टात आलेले आहेत. थकबाकीदार गाळेधारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी थकीत भाडे न भरल्यामुळे या थकबाकीदारांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81(ब) नुसार जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

ahilyanagar
Ahilyanagar News: कांद्याची माळ अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न

रंगभवन व केडगावकरांनी भरली थकबाकी

रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकांवर कारवाई सुरू करताच गाळेधारकांनी 48 लाख 96 हजार रुपये जमा केल्याने त्यांची कारवाई टळली. केडगावच्या भाग्योदय व्यापारी संकुलातील व्यापार्‍यांनीही काही रक्कम जमा केल्याने तूर्तास कारवाई टळली आहे. थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेची कठोर कारवाई सुरू आहे. त्यामुळे गाळेधारकांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news