

अहिल्यानगर: जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Ahilyanagar News)
श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्ते हातात कांद्याची माळ घेऊन आले.
त्यावेळी एका कार्यकर्त्याने हातातील माळ गरागरा फिरवत अजित पवारांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तेथील एकाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यास रोखले. त्यानंतर, अरविंद कापसे आणि नाना शिंदे यांना पोलिसांनी ताब्यातघेतले आहे.