Sangram Jagtap Threat Case: आ. जगतापांना धमकी देणार्‍याला तेलंगणातून अटक; नगर पोलिसांची कारवाई

आरोपी शेखचे वास्तव्य छत्रपती संभाजीनगरात
Sangram Jagtap Latest News
आ. जगतापांना धमकी देणार्‍याला तेलंगणातून अटक; नगर पोलिसांची कारवाईFile Photo
Published on
Updated on

Sangram Jagtap Threat Accused Arrested

नगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना धमकी देणार्‍या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तेलंगणातून बेड्या ठोकल्या आहेत. तो मूळचा चकलंबा (बीड) येथील असून सध्या छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अनिस महंमद हनिफ शेख असे अटक केलेल्या या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला असता अनिस शेख हा तेलंगणा राज्यात असल्याचे समोर आले. (Latest Ahilyanagar News)

Sangram Jagtap Latest News
Donkey Theft: बाबो! पुणतांबामध्ये चक्क 10 गाढवांची चोरी!

नगर पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी तेलंगणा राज्यात पोहचले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शेख यास धग्गी (ता.जि. निजामाबाद) येथून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने स्वत:च्या व दुसर्‍याच्या मोबाईलवरून आमदार संग्राम जगताप यांना धमकीचा टेक्स्ट मेसेज केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या शेख यास कोतवाली पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.

आ. संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाठ व एका तरुणीच्या इन्स्टाग्रामअकांऊटवर आरोपीने मेसेज पाठविले होते. तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसात बीएनएस 2023 चे कलम 78, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67, 67(अ) व पोक्सो कायद्याचे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Sangram Jagtap Latest News
Contaminated Water: अकोल्यात पाण्याचे 41 नमुने दुषित; राजूरमध्ये 35 ठिकाणी आढळले दूषित पाणी

शिरसाठ यांच्या मोबाईलवर अनोळखी मोबाईल नंबरवरून ‘संग्राम को दोन दिन के अंदर खत्म करूंगा’ असा मेसेज आल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा बीएनएस कलम 351 (4) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

आ. संग्राम जगताप यांना अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या दोन धमकी प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त करून तपासाचे आदेश दिले होते. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news