

संगमनेरः संगमनेर तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असली, तरी काही गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. परिणामी 5 गावांसह 11 अकरा वाड्यांसाठी पाच टँकर्सद्वावे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
मे महिन्यात संगमनेर तालुक्यात ‘अवकाळी’ने दमदार हजेरी लावली. बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले होते. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतात पाणी साठून पिकांची हाणी झाली. (Latest Ahilyanagar News)
शेतकर्यांनी, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून, शासनाकडे मदतीची मागणी केली होती. दरम्यान, मे महिन्यामध्ये तब्बल 26 गावांसह 63 वाड्यांना 21 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.
यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता. परिणामी यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात पिण्याच्या पाण्याच्या टँकर्सची संख्या कमी झाल्याचे सुखद चित्र पहायला मिळाले. जून महिन्यातही पावसाने कमी -अधिक प्रमाणात तालुक्यात हजेरी लावली. जुलैमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत.
सध्या तालुक्यात समाधानकारक पाणी असल्यामुळे टँकर्सची मागणी हळू-हळू घटत आहे. लवकरचं टँकर बंद होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. खांबे, सायखिंडी, डोळासने, कौठे मलकापूर व सोनोशीया 5 गावांसह 11 वाड्यांसाठी 5 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. सध्या अन्य ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे टँकर्रची मागणी केली नाही.
परिणामी आता टँकर्सद्वारे पाणी पुरवठा हळू-हळू बंद होणार आहे. तालुक्यात जल जीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्रीच आहेत. परिणामी अनेक गावे पाण्यापासून वंचितच आहेत. यामुळे या या योजना ठेकेदारांसाठी फायदेशीर तर, नागरिकांसाठी त्रासदायक ठरल्या आहेत.
टँकर्स संख्या पहिल्यांदाच कमी!
संगमनेर तालुक्यात मे महिन्यात तब्बल 26 गावांसह 63 वाड्यांसाठी 21 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार बॅटींग केली. यामुळे पहिल्यांदाच मे महिन्यात टँकर्स संख्या कमी झाली. सध्या 5 गावांसह 11 वाड्यांसाठी 5 टँकर्रद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.