Nilesh Lanke News: दोनशे निवृत्त शिक्षकांसह खा. लंकेंची दिल्लीत धडक

पंतप्रधान व अर्थमंत्री यांची भेट घेऊन मांडणार त्यांचे विविध प्रश्न
Nilesh Lanke
दोनशे निवृत्त शिक्षकांसह खा. लंकेंची दिल्लीत धडकPudhari
Published on
Updated on

नगर: शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या आणि अनेक पिढ्या घडवलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्या मार्गी लावण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी 200 सेवानिवृत्त शिक्षकांना बरोबर घेत शनिवारी दिल्ली दौर्‍यावर रवाना झाले आहेत.

अहिल्यानगर शहरातील रेल्वे स्थानकावर खासदार लंके यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक द.मा. ठुबे, बन्सी उबाळे, ज्ञानदेव लंके, विनायक कोल्हे, अशोकराव बागुल, महादेव गांगर्डे, सूर्यभान काळे, किशोर हार्दे, अशोक धसाळ, दत्तात्रय गावडे, गजानन ढवळे, प्रदीप खिलारी, पोपट इथापे, नन्नवरे, बाळासाहेब लगड, अशोक गायकवाड, रावसाहेब पवार, विनीत कोल्हे, अनिल नलगे, मोहन पवार आदींसह सर्व तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख यांच्यासह सेवानिवृत्त शिक्षक बांधव उपस्थित होते. (Latest Ahilyanagar News)

Nilesh Lanke
Shrigonda: जिल्ह्यात होणार सात नवीन पोलिस ठाणी; आमदार पाचपुते यांच्या मागणीला यश

या दौर्‍यात खासदार लंके यांच्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षक पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सितारामन व शरद पवार यांची भेट निश्चित करण्यात आली आहे. तसेच यावेळी संसद व राष्ट्रपती भवनाची पहाणी करणार आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शन, वेतन विसंगती, वैद्यकीय सुविधांबाबतचे मुद्दे मांडले जाणार आहेत.

या दिल्ली यात्रेत प्रवास, निवास व भोजन यांची उत्तम व्यवस्था खासदार लंके यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच दिल्लीमधील ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याची संधी शिक्षकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे बहुतांश शिक्षक दिल्लीला पहिल्यांदाच जाणार असल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

Nilesh Lanke
Sangram Kale: ‘त्या’ दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाका! आ.काळेंची अधिवेशनात मागणी

न्याय्य मागण्यांसाठी सदैव कार्यरत

अनेक पिढ्या घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यांचे प्रश्न सोडविणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. शिक्षक ही माझ्या जीवनाची मूलभूत प्रेरणा आहेत. माझे वडीलही शिक्षक होते. त्यांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मी सदैव कार्यरत असल्याचे खासदार लंके म्हणाले. सेवानिवृत्त शिक्षकांसाठी हे अविस्मरणीय क्षण असून, बहुतांश शिक्षक पहिल्यांदाच दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news