Sangamner Bribery Case: मंडळ अधिकाऱ्यासाठी ५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी तरुण रंगेहाथ अटकेत

हिवरगाव पावसा टोलनाका परिसरातील कारवाई; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात नितीन खर्डे जेरबंद
Bribery Case
Bribery Case(Pudhari Photo)
Published on
Updated on

संगमनेर/आश्वी: तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात असलेल्या एका  हॉटेलवर मंडळ अधिकाऱ्यासाठी (सर्कल) पाच हजार रुपयांची लाच स्वीकारता़ंना सोमवारी दुपारी एका खासगी तरुणाला अटक करण्यात आली असल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी यांनी दिली.

Bribery Case
Anna Hazare RTI Protest: माहिती अधिकार कायद्यावरील दुरुस्त्या मागे घ्या; अन्यथा उपोषण : अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा

नितीन किसन खर्डे (वय २९ वर्षे,रा. मु.पो. चंदनापुरी-झोळे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून रात्री उशिरा तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हा जेसीबी मशीनने शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे सपाटी करणाचे काम करतात.

Bribery Case
Sanchita Ugale Death: अभिनेत्री संचिता उगले यांचे वयाच्या २५ व्या वर्षी निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

दि.८ जून रोजी खाजगी व्यक्ती नितीन खर्डे यांने तक्रारदर यांना तलाठी कार्यालयात बोलावुन घेतले. त्यावेळी तेथे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी सदर कामकाजाबाबत बोलणे केले. त्यानंतर तक्रारदार तलाठी कार्यालयाबाहेर जात असताना,

Bribery Case
Sangamner Illegal Sand Transport: घारगाव पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त

खासगी इसम नितीन खर्डे यांनी तक्रारदर यांचेकडून शेत जमिनीच्या सपाटी करणाचे काम करण्यासाठी मंडळ अधिकारी यांचे करिता पाच हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करील अशी धमकी लाचेची मागणी केली. यानंतर तकारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तकार केली. सदर तक्रारीची दखल घेत दि.१९ जून रोजी पडताळणी केली असता, खाजगी इसम नितीन खर्डे यांनी तक्रारदार यांचेकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन ते स्विकारण्याचे मान्य केले.

Bribery Case
Ganesh Idol Price 2026: गणेशमुर्ती २५% महाग; कच्चा माल व वाहतूक खर्च वाढल्याने भावात मोठी वाढ

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिवरगाव पावसा टोल नाका परिसरात सोमवारी (दि.२२) दुपारी सापळा रचला खाजगी इसम नितीन खर्डे यांला तक्रारदाराकडून ५ हजार रूपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. नितीन खर्डे याला ताब्यात घेण्यात आले रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या कारवाईत पथकात पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली खांडवी पोहवा. संदिप वनवे, पो.कॉ. प्रमोद पाळदे, लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक सहभागी झाले होते‌.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news