Sakur Rural Development: साकूर पठार भागाला विकासातून जाणून-बुजून वंचित ठेवले; आमदार खताळांचा इशारा

साकूर पठारातील वाडी-वस्त्यांवर रस्ते, पाणी, व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव; आमदार अमोल खताळ यांनी स्थानिक विकास कामांचा शुभारंभ केला
Sakur Rural Development
साकूर पठार भागाला विकासातून जाणून-बुजून वंचित ठेवलेPudhari
Published on
Updated on

संगमनेर : साकुर पठार भागातील वाडी-वस्त्यांवर अजूनही रस्ते,पाणी, व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून जाणून-बुजून वंचित ठेवले. महायुतीच्या पाठीमागे उभे रहा, तालुक्यातील कुठलेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यांनी व्यक्त केला. साकुर पठार भागात अनेक जण दहशत, दादागिरी करत जनतेला त्रास देण्याचे काम करत आहे .त्यांचाही लवकरच बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.  (Latest Ahilyanagar News)

संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येत असणाऱ्या सुतारवाडी पायरवाडी गि-हे वाडी शेंडेवाडी अंतर्गत सतीचीवाडी गुंजाळवाडी पठार मांडवे शिंदोडी बिरे वाडी व जांबुत येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाबासाहेब कुटे, बुवाजी खेमनर, गुलाब भोसले, ऱौफभाई शेख, इसाक पटेल, सुभाष पेंडभाजे, रवींद्र दातीर, सुभाष भुजबळ, अमृता कोळपकर, अमित धुळगंड, संदीप खिलारी, शेंडेवाडी सरपंच कमल गावडे उपस्थित होते.

Sakur Rural Development
Tribal rights: मृत्यूनंतरही संपल्या नाहीत आदिवासींच्या यातना; तहसील कार्यालयातच अंत्यविधीची वेळ

आमदार खताळ म्हणाले की, शासनाच्या सर्व योजनांचा लाभ खऱ्या आदिवासी बांधवांना मिळाला पाहिजे. भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना शालेय दाखले, तसेच रेशनकार्ड, आणि शासकीय, योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत करावी. तुमच्या वाडी वस्तीवरील विजेचे ट्रान्सफॉर्मर मंजूर करून वीज समस्या सोडवली जाईल. पुरंदर धरणातील गळती थांबवण्यासाठी जलसंपदा विभागाला सूचना देऊन गळती थांबवली जाईल.

Sakur Rural Development
Kamargaon Onion Crisis: कामरगावच्या शेतकऱ्यांना कांद्याने रडविले; भाव नाही, कांदा रस्त्यावर फेकावा लागला

यावेळी उपसरपंच भाऊ उगले, ज्ञानदेव वामन, गजानन खाडे, गोंदकेमामा, नितीन डोळझाके, कर्जुलेपठारचे सरपंच किरण भागवत, माजी सरपंच रवींद्र भोर, मारुती आगलावे, मांडवेचे उपसरपंच शब्बीर शेख,धोंडीभाऊ वाडेकर,बिरेवाडीचे माजी सरपंच बाबाजी सागर, शिंदोडीचे पाटीलबा कुदनर, विठ्ठल नाईकवाडी, संतोष शेटे,बाळासाहेब झिटे, राजेंद्र डोंगरे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news