

कोळपेवाडी: ग्रामपंचायत प्रशासनाचा कार्यभार व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतींना नवीन इमारतीची आवश्यकता होती. या कामासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील तब्बल 8 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 25 लाख याप्रमाणे एकूण 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणार्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र, सूसज्ज कार्यालयीन इमारत मिळावी. नागरिकांना चांगली सेवा मिळावी, या उद्देशातून आमदार काळे यांनी महायुती शासनाकडे पाठपुरावा केला. (Latest Ahilyanagar News)
ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकार्यांना गावचा कारभार पाहताना येणार्या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी मतदार संघातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांच्या नूतन इमारतीसाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दिला आहे.
मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाला गती देवून, शासकीय कार्यालयांचादेखील विकास करण्यावर आमदार आशुतोष काळे यांनी भर दिला आहे. यामुळे प्रशासकीय अधिकार्यांची मोठी अडचण दूर होवून, नागरिकांना सेवा मिळण्याची सुविधा निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतींना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आमदार काळे यांनी आभार मानले.
‘या’ गावांसाठी निधी मंजूर!
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चासनळी, शिंगणापूर, धारणगाव, मुर्शतपूर, करंजी, दहेगाव बोलका, जेऊर पाटोदा व धोत्रे या ग्रामपंचायतींच्या नूतन इमारतीसाठी 2 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.