नेवासा: शनिशिंगणापूरला शनिवारी (19 जुलै) शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासून भाविकांच्या रांगा दर्शनरांगेत होत्या. तसेच तेलाभिषेक करण्यासाठी चौथर्यावर दिवसभर भाविकांची गर्दी होती.
दीव दमणचे राज्यपाल प्रफुल्ल पटेल यांनी सकाळी, तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या पत्नी अॅड. जिजामाला यांनी दुपारी उदासी महाराज मठात अभिषेक करून चौथर्यावर जाऊन तेलाभिषेक करून शनिदेवाचे दर्शन घेतले. (Latest Ahilyanagar News)
देवस्थान जनसंपर्क कार्यालयात मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे यांनी निंबाळकर यांचे स्वागत केले. दिल्लीचे शुखबीन शोकीन यांनी प्रसादालयात दिवसभर शिंगणापूरला आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला. वाशीम जिल्ह्यातील रामराव वानखेडे यांनीही काही भाविकांना प्रसाद वाटप केले.