Rahuri Minor Marriage Case: राहुरीत अल्पवयीन मुलींच्या विवाहाची दोन धक्कादायक प्रकरणे; पतींसह १३ जणांवर गुन्हे

वय लपवून विवाह, गर्भधारणा आणि सासरी छळ उघड; पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू
Child Marriage
Child MarriagePudhari
Published on
Updated on

राहुरी: तालुक्यातील सडे येथील २८ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीचे वय लपवून विवाह लावल्याचा तसेच विवाहानंतर सासरी तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती, सासू, नणंद, विवाह जुळवून देणारा मध्यस्थ तसेच इतर नातेवाईकांसह १२ ते १३ जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Child Marriage
Pathardi Crime: पाथर्डी पोलिस ठाण्यातून बलात्कार प्रकरणातील संशयित फरार? पोलिस कर्मचाऱ्यावर मदतीचा गंभीर आरोप

पहिला गुन्हा मुंबईतील वडाळा पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर राहुरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. पीडित मुलगी सध्या १७ वर्षे ११ महिने वयाची असून ती पूर्वी पाथर्डी तालुक्यात राहत होती. आरोपी तरुण सडे येथील आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. कुटुंबीय विवाहास विरोध करतील या भीतीने त्यांनी १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सडे येथील महादेव मंदिरात विवाह केला.

Child Marriage
Shrirampur Traders Police Protection: व्यापाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांची गय नाही; ‘पोलिस तुमच्या पाठीशी’, एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आश्वासन

जानेवारीमध्ये मुलीला त्रास झाल्याने तिला राहुरी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीत ती दीड महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर प्रसूतीसाठी नावनोंदणी करण्याच्या उद्देशाने २६ जून रोजी ती मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये गेली. तेथे ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत वडाळा पोलिसांना माहिती दिली. चौकशीत विवाहाच्या वेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक माधुरी पोकळे यांच्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे.

Child Marriage
Dr Kumar Saptarshi Passes Away: समाजवादी विचारांचा बुलंद आवाज हरपला! डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीवर शोककळा

दुसऱ्या घटनेत नागापूर (अहिल्यानगर) परिसरातील १५ वर्षीय मुलीचा विवाह ७ मे रोजी राहुरी येथील राजवाडा परिसरातील एका तरुणासोबत लावण्यात आला. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही कुटुंबीय आणि मध्यस्थाने हा विवाह घडवून आणल्याचा आरोप आहे.

Child Marriage
Madhi Mayamba Yatra Gold Jewellery Theft: मढी-मायंबा यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; चार घटनांत साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास

सासरी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. कंटाळून तिने आईशी संपर्क साधला. त्यानंतर २९ मे रोजी तिची आई तिला माहेरी घेऊन गेली. माहिती मिळाल्यानंतर स्नेहालय संस्थेच्या उडाण प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी मुलीच्या वयाची पडताळणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर मुलीने संस्थेच्या कार्यकर्त्यांसमवेत १७ जुलै रोजी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पती, सासू, नणंद, विवाह जुळवून देणारा मध्यस्थ तसेच इतर संबंधित, अशा १२ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक फौजदार तुळशीदास गितेे तपास करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news