Pathardi Crime: पाथर्डी पोलिस ठाण्यातून बलात्कार प्रकरणातील संशयित फरार? पोलिस कर्मचाऱ्यावर मदतीचा गंभीर आरोप

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी; फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव व धमक्यांचाही नातेवाइकांचा आरोप, चौकशीचे आदेश
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: तालुक्यातील एका बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिस ठाण्यात आणलेल्या एका संशयित आरोपीला पोलिस कर्मचाऱ्यानेच पळून जाण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Assault
Shrirampur Traders Police Protection: व्यापाऱ्यांना धमक्या देणाऱ्यांची गय नाही; ‘पोलिस तुमच्या पाठीशी’, एसपी मुम्मका सुदर्शन यांचे आश्वासन

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१६ जुलै) बलात्कार प्रकरणातील संशयित गणेश बाळासाहेब म्हस्के हा गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेदरम्यान पाथर्डी पोलिस ठाण्यात उपस्थित होता. त्याला एका खोलीत बसविण्यात आले होते. याच दरम्यान संबंधित पोलिस कर्मचारी वारंवार त्या खोलीत ये-जा करत असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी एक होमगार्ड तैनात होता. मात्र, होमगार्ड काही काळासाठी तेथून गेल्यानंतर संशयिताने तेथून पलायन केल्याची चर्चा आहे. या संपूर्ण घटनेचे चित्रण पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झाल्याचा दावा पीडितेच्या नातेवाइकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित फुटेज तपासून सत्य बाहेर आणण्याची मागणी होत आहे.

Assault
Dr Kumar Saptarshi Passes Away: समाजवादी विचारांचा बुलंद आवाज हरपला! डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीवर शोककळा

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला दम भरत संशयित आरोपीला तातडीने हजर करण्याचे आदेश दिल्याचे समजते. दरम्यान, या बलात्कार प्रकरणात विविध राजकीय नेत्यांचा दबाव असूनही गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलिस निरीक्षक कोकरे यांचे अनेक नागरिकांनी कौतुक केले आहे. मात्र, दुसरीकडे एका कर्मचाऱ्याच्या कथित वर्तनामुळे संपूर्ण पोलिस खात्याची प्रतिमा मलीन होत असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

Assault
Madhi Mayamba Yatra Gold Jewellery Theft: मढी-मायंबा यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ; चार घटनांत साडेसहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास

या संदर्भात पोलिस निरीक्षक कोकरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणात आरोपीला पळून जाण्यास पोलिस कर्मचाऱ्याने मदत केली असेल तर चौकशी करून त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठवू, असे त्यांनी सांगितले.

Assault
Parner Urea Shortage: 'पुढारी'च्या बातमीनंतर पारनेरात युरिया उपलब्ध; मात्र एका केंद्रावरच वाटपाने शेतकऱ्यांची मोठी गर्दी

फिर्यादींनाच दमबाजी?

फिर्यादीच्या नातेवाइकांनी संबंधित पोलिसावर आणखी गंभीर आरोप केले आहेत. आरोपीची बाजू घेत फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा, तसेच तुमच्यावरच खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संशयित आरोपीचा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असून त्याचे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याशी जवळचे संबंध असल्याचाही आरोप नातेवाइकांनी केला आहे. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news