Rahuri Highway Accident: प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला जाताना भीषण अपघात, राहुरीत विद्यार्थ्याचा मृत्यू; परिसरात हळहळ

नगर–मनमाड महामार्गावरील दोन भीषण अपघातांत एकाचा बळी, तिघे गंभीर जखमी
Rahuri Highway Accident
Rahuri Highway AccidentPudhari
Published on
Updated on

राहुरी: देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–मनमाड महामार्गावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाती रक्तपात झाला. रस्त्याच्या कामातील प्रचंड दिरंगाई, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक यामुळे एकाच दिवशी दोन भीषण अपघात झाले. यात १८ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा मृत्यू नसून प्रशासनाने घडवलेला खून असल्याचा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.

Rahuri Highway Accident
MGNREGA Employees Strike: मनरेगा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; सेवेत नियमितीकरणाची प्रमुख मागणी

पहिल्या अपघातात गोटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर (वय १८) हा बी.एस्सी. ॲग्रीचा विद्यार्थी आपल्या मित्रासह ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जात असताना गाडगे आश्रम शाळेसमोर ट्रकने त्याला चिरडले. रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे आणि वाहतूक नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाला. ट्रकखाली आल्याने संकेतचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र श्रीकांत हापसे (वय २१) याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

Rahuri Highway Accident
Karjat Court Building Expansion: कर्जत न्यायालयाच्या इमारतीवर अतिरिक्त मजला; मुख्यमंत्री फडणवीस यांचे लेखी आश्वासन

पहिली घटना ताजी असतानाच काही वेळातच राहुरी बस स्थानकासमोर दुसरा भीषण अपघात झाला. खडीवरून दुचाकी घसरल्याने प्रसाद गागरे (वय १८) आणि सार्थक आहेर (वय १९) या तरुणांना आयशर टेम्पोने उडवले. या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा चेंदामेंदा झाला असून पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला आहे.

Rahuri Highway Accident
Shrirampur Gram Panchayat Member Assault: उक्कलगावमध्ये ग्रामपंचायत सदस्यासह दोघांना बेदम मारहाण

या दोन्ही अपघातांना अहिल्यानगर जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदार कंपनी थेट जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता रस्त्यावर खडी टाकून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्यात आला आहे. अवजड वाहतूक सुरू ठेवून प्रशासनाने जणू मृत्यूला खुले आमंत्रण दिले आहे.

Rahuri Highway Accident
Shrirampur Thar Car Arson Case: २० हजार रुपये न दिल्याने श्रीरामपूरमध्ये थार गाडी पेटवली

एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्यानंतरही प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने तातडीने अवजड वाहतूक बंद करावी, रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे व जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा राहुरीत तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिक व रस्ता दुरुस्ती कृती समितीने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news