

जवळा: गेल्या अनेक वर्षांपासून सेवेत परंतु प्रलंबित असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत नियमित करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. पारनेर तालुक्यातही त्याचे पडसाद म्हटलेआहेत.
येथील कर्मचारी दि 23 पासून काम बंदचे आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काळ्याफिती लावून तहसील कार्यालयात तहसीलदार गायत्री सौदाणे यांना सदर आंदोलनाबाबतचे निवेदन देऊन त्यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनाही प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मनरेगाचे कंत्राटी कर्मचारी, अधिकारी व समकक्ष योजनांमधील कर्मचाऱ्यांना शासनाने कायम सेवेत सामावून घ्यावे. कामाचा ताण पाहता. सरकारने अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित ठेवला.
कर्मचाऱ्यांची सर्व स्तरांतून कुचंबना होत आहे. त्यांना आवश्यक ते संरक्षण मिळावे समान काम समान वेतन या धर्तीवर त्यांची सेवा नियमित करावी, याबाबत सरकारने आता ठोस पावले उचलण्यासाठी पारनेर येथील मनरेगा कक्षातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सहभागी होत काळ्याफिती लावून मागण्यांचे निवेदन देत काम बंद आंदोलन पुकारले.
यावेळी पारनेर प्रकल्प अधिकारी प्रियंका चौधरी सहायक अधिकारी महेश शिंदे, तांत्रिक सहायक प्रणव आठरे, डाटा एन्ट्री सहायक पूनम मगर, आकाश भालेराव आदी उपस्थित होते.