Rahul Jagtap Datta Pansare: जिल्हा बँकेच्या राजकारणात राहुल जगतापांची खेळी; प्रतापसिंह पाचपुतेंची माघार!

दत्ता पानसरे बिनविरोध संचालक; श्रीगोंद्याच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना नवे वळण
Rahul Jagtap Datta Pansare
Rahul Jagtap Datta PansarePudhari
Published on: 
Updated on: 

अमोल गव्हाणे

श्रीगोंदा: कुकडी कारखान्याचा मुद्दा पुढे करून राहुल जगताप यांना कोंडीत पडकत श्रीगोंद्यावर हुकूमत गाजवू पाहणारे आ. विक्रमसिंह पाचपुते यांना सहकाराच्या राजकारणात सणसणीत चपराक बसली. राहुल जगताप यांच्या डावपेचासमोर आ. पाचपुते यांच्यावर जिल्हा बँकेचे मैदान सोडण्याची नामुष्की ओढवली. आ. पाचपुतेंचे मनसुबे धुळीस मिळवताना किंगमेकरच्या भूमिकेतील राहुल जगताप यांनी दत्ता पानसरे यांना जिल्हा बँकेत बिनविरोध पाठवण्यात बाजी मारली. श्रीगोंद्याच्या राजकारणात आजपर्यंत कधीही पाहावयास न मिळालेली सत्तापालटाची ‘मॅजिक मोमेन्ट’ जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवण्यास मिळाली.

Rahul Jagtap Datta Pansare
Rahuri Gharakul Yojana: १० वर्षांपासून घरकुलाचा लाभ नाही; संतप्त लाभार्थ्याने ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकले कुलूप

भाजपने नवोदित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बंधू प्रतापसिंह यांना जिल्हा बँकेचे संचालक करण्याची रणनीती आखली. त्यासाठी विखे-थोरातांशी जुळून घेतले. दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप यांनी मात्र विजयाचे गणित कागदावर उतरवले होते. श्रीगोंदा तालुक्यातील १६८ ठरावातील ‘मॅजिक फिगर’ राहुल जगताप यांनी कधीच गाठली होती. बँक निवडणूक लढण्यावरही ते ठाम होते. कुकडी साखर कारखान्याच्या जप्तीचा मुद्दा पुढे करत आ. पाचपुते यांनी मुंबईतून ‘फोनइन’ कार्यक्रम राबवत ‘प्रेशर टॅक्टीज’ने जगतापांची कोंडी केली. भाजपच्या शीरस्थ नेत्याच्या ‘शब्दा’ला मान देताना राहुल जगताप यांच्यासमोर माघारीशिवाय पर्यायच नव्हता. राहुल जगताप यांनी माघार घेतली की प्रतापसिंह पाचपुते यांची जिल्हा बँकेची वाट मोकळी असा अंदाज बांधत श्रीगोंद्यावर एकहाती वर्चस्व सिद्ध करण्याचा डाव आ. विक्रमसिंह पाचपुते यांनी आखला. मात्र त्याला सुरूंग कधी लागला, याचा पत्ताही आ. पाचपुते यांना लागला नाही. अर्थात यंत्रणेच्या भरवशावर राजकारण करू पाहणारे आ. पाचपुते ‘रेड झोन’मध्ये पोहचल्यावर जागे झाले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Rahul Jagtap Datta Pansare
Rashin Jagdamba Devi Palkhi Mahotsav: राशीनच्या जगदंबा देवीचा पालखी महोत्सव भक्तिभावात; हजारो भाविकांची मांदियाळी

बबनदादा पाचपुतेंच्याच पठडीत तयार झालेले दत्ता पानसरे यांनी संधी साधली. राहुल जगताप यांच्या माघारीची कुणकुण लागताच पानसरे यांनी डावपेच टाकत त्यांचे मतदार (ठराव) आपल्याकडे वळवले. याची खबर ना आमदार पाचपुतेंना लागली, ना त्यांच्या यंत्रणेला (हे पाचपुतेंच्या यंत्रणेचे अपयशच)! स्वत: उमेदवार नसल्याने राहुल जगताप यांनीही ‘फ्री हॅण्ड’ दिल्याने दत्ता पानसरे केवळ उमेदवारच झाले नाहीत, तर थेट बिनविरोधापर्यंत पोहचले. अर्थात ही सगळी किमया जगतापांचीच असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Rahul Jagtap Datta Pansare
Madhi Devotees Car Accident: मढीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांची कार मुळा कालव्यात; तिघांचा बुडून मृत्यू

आ. विक्रम पाचपुते यांनी बंधू प्रतापसिंह यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली. विखे-थोरात युतीकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वीही झाले. पण ‘मॅजिक फिगर’ची बोंबाबोंब झाली. मग राजकारणातील दोन मातब्बरांकडे मदतीसाठी साद घातली. त्याला प्रतिसाद देताना श्रीगोद्याच्या राजकारणात पाचपुतेंसाठी नव्याने खेळ मांडण्यास प्रारंभ झाला. आ. पाचपुते थेट राहुल जगतापांच्या भेटीला पोहचले. या भेटीत ‘ठराव’ची बातचीत केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ते ठराव पानसरेंच्या बाजूला वळले होते. आता पानसरे यांना गाठून त्यांचीच माघार करण्याचा आणखी एक डाव पाचपुतेंनी टाकला. पण बबनदादांच्या पठडीत कसलेले दत्ता पानसरे मोबाईल स्वीच ऑफ करून गायब झाले. अर्थात पानसरेंचा

अतापत्ता राहुल जगतापांना ठाऊक होता, पण त्यांनी पाचपुतेंना ठावच लागू दिला नाही. विजयाचा ‘आकडा’ गाठण्यात अपयश येत असल्याचे दिसताच आ. पाचपुतेंवर ‘रिव्हर्स’ टाकण्याची वेळ आली, परिणामी प्रतापसिंह पाचपुते बिनविरोध होतील, अशी आवई उठलेली असतानाच त्यांच्यावर माघारीची नामुष्की ओढावली.

Rahul Jagtap Datta Pansare
Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत ‘करेक्ट कार्यक्रम’ कुणाचा? विखे-थोरातांच्या युतीने राजकीय समीकरणे बदलली!

निवडणूक न लढताही जगताप जिंकले!

जिल्हा बँक ही जिल्ह्याच्या राजकारणाचा कणा असल्याने श्रीगोंद्यावर पकड हवी असल्यास बँकेत जाणे आ. पाचपुतेंच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले. त्यातून वर्चस्वही सिद्ध होणार होते. राहुल जगताप हे आ. पाचपुतेंचे राजकीय प्रतिस्पर्धी. आ. पाचपुतेंचा डाव उलटवत किंगमेकरची भूमिका निभावणारे राहुलदादा मात्र दत्ता पानसरे यांना बिनविरोध संचालक करून भारी भरले, नव्हे आ. पाचपुतेंना सणसणीच चपराक देण्यातही यशस्वी झाले. २०२४ च्या विधानसभेला पराभव झाल्यानंतर राहुल जगताप संपल्याची आवई उठवली गेली. मात्र निवडणूक न लढताही जिंकता येते, हे दाखवून देणारे राहुल जगताप यांच्या समर्थकांना पानसरेंच्या बिनविरोधाने अन्‌ प्रतापसिंहाच्या माघारीने नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र श्रीगोंद्यात उमटले.

पडद्यामागे अतुल!

राहुल जगताप यांची उमेदवारी निश्चित मानून दत्ता पानसरे यांनी अर्जही दाखल न करण्याची भूमिका घेतली. मात्र ‘कुकडी’ची आडकाठी आली तर काय? राजकीय प्रतिस्पर्धी पाचपुतेंना आयते द्यायचे का? या विचाराने राहुल जगतापांशी एकनिष्ठ असणारे बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे परेशान होते. काहीही करून दत्ता पानसरे जिल्हा बँकेवर गेलेच पाहिजेत, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी दत्ता पानसरे यांना राजी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास भाग पाडले. अतुल लोखंडे यांची हीच चाल दत्ता पानसरे यांना बिनविरोध संचालक करण्यापर्यंत पोहचलीच; शिवाय पाचपुते नावाचा काटाही रस्त्यातून हटवण्याला कारणीभूत ठरली.

जिल्हा बँकेत बिनविरोध संचालक होण्याची संधी फक्त राहुल जगताप यांच्यामुळेच मिळाली. माध्यमांसमोर काही गोष्टी बोलाव्या लागतात. बँकेत यापुढे डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासोबत असणार आहे.

दत्तात्रेय पानसरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news