Rabi Crop Insurance: जिल्ह्यातील २० हजार शेतकर्‍यांचा पीकविमा; ज्‍वारीसाठी उरले चार दिवस, १.२९ लाख हेक्‍टरवर रब्‍बी पेरा

२५ नोव्हेंबरपर्यंत १ लाख २९ हजार ७६४ हेक्टरवर रब्बी पेरणी; ज्वारी पीकविम्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर
Agriculture News
Agriculture NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: पावसाअभावी यंदाचा रब्‍बी हंगाम जोखमीचा असणार आहे. त्‍यामुळे रब्बी पिकांचा पीकविमा उतरवणार्‍याची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० हजार ११५ शेतकर्‍यांनी पीकविमा उतरविला आहे.

दरम्‍यान, २५ नोव्‍हेंबरपर्यंत उसासह १ लाख २९ हजार ७६४ हेक्‍टर क्षेत्रावर रब्‍बी पेरणी झाली. यामध्‍ये ६१ हजार ६९ हेक्‍टर क्षेत्रावरील ज्‍वारीचा समावेश आहे. ज्‍वारी पिकाचा विमा उतरवण्‍याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे.

Agriculture News
Shrirampur water supply scheme: मुळा धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी सरसावली श्रीरामपूर पालिका; सर्वसाधारण सभेत विषय सादर करणार

यंदा पावसाने दगा दिल्‍यामुळे भूजलपातळी कमालीची खालावली आहे. त्‍यामुळे आतापासूनच विहिरींनी तळ गाठला असून, गावपातळीवरील तलाव कोरडेठाक पडले आहेत. अशा परिस्‍थितीतही शेतकर्‍यांनी धरणांच्‍या आवर्तनावर भरोसा ठेवून लाभक्षेत्रातील शेतकरी रब्‍बी पेरणी करीत आहेत.

जिल्ह्यात उसासह २४ टक्‍के क्षेत्रावर रब्‍बी पेरणी झाली आहे. ज्‍वारीचा सर्वाधिक पेरा जामखेड तालुक्‍यातील ३१ हजार १०७ हेक्‍टरवर झाला आहे.

Agriculture News
Tajanapur Lift Irrigation Scheme: ‘ताजनापूर’टप्पा तीनच्या सर्वेक्षणाला गती द्या; मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठक

गव्‍हाच्‍या पेरणीनेही आता वेग घेतला असून, १७ हजार ८१२ हेक्‍टरवर पेरा झाला आहे. मकाची पेरणी २३ हजार ४४१ तर हरबरा पेरणी २२ हजार ६५३ हेक्‍टर क्षेत्रावर झाली.तीळ, सूर्यफूल आदी पिकांची अद्याप पेरणी झाली नाही. करडईची पेरणी फक्‍त १५, तर जवसाची ८ हेक्‍टरवर झाली आहे.

रब्‍बी हंगाम यंदा हाती लागतो की नाही अशी परिस्‍थिती आहे. अशा परिस्‍थितीत शेतकरी पेरणी करत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षणाच्या दृष्टीने पीकविमा योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

त्‍यामुळे सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्‍या वाढण्‍याची शक्‍यता आहे. मात्र, यासाठी फार्मर आयडी व ई-पीक पाहणी नोंद अनिवार्य आहे. पिकाचे डिजिटल क्रॉप सर्वे बंधनकारक असणार आहे.

उसाची फक्‍त ३.५३ टक्‍के लागवड

बारामाही आणि नगदी पीक असलेल्‍या उसाची पेरणी पावसाअभावी रखडली आहे. नवीन उसाच्‍या लागवडीसाठी ९४ हजार ६९३ हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित करण्‍यात आलेले आहे. मात्र, सध्‍या पाण्‍याअभावी फक्‍त ३ हजार ३४७ हेक्‍टरवर लागवड झालेली दिसत आहे.

यामध्‍ये शेवगाव तालुक्‍यातील १ हजार ४४२ हेक्‍टरचा समावेश आहे. आगामी गळीत हंगामासाठी उसाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासणार आहे.

पीकविमा अंतिम तारीख

गहू, हरभरा, कांदा, मका व इतर पिकांसाठी अर्ज भरण्‍याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२६ आहे. उन्‍हाळी भुईमुगासाठी ३१ मार्च २०२७ अंतिम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.