Shrirampur water supply scheme: मुळा धरणातून स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेसाठी सरसावली श्रीरामपूर पालिका; सर्वसाधारण सभेत विषय सादर करणार

स्वतंत्र बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना राबवण्याचा विषय ३० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार
Shrirampur water supply scheme
Shrirampur water supply schemePudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूरः शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यात पाणीपुरवठ्याबाबत निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता, भंडारदरा व निळवंडे धरणांबरोबरच आता मुळा धरणातुनही पाणी आरक्षित करून, स्वतंत्र बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा योजना राबवण्याचा महत्त्वाचा विषय श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे.

नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवार (दि. ३० नोव्हेंबर) रोजी सकाळी नगरपरिषद कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

Shrirampur water supply scheme
Tajanapur Lift Irrigation Scheme: ‘ताजनापूर’टप्पा तीनच्या सर्वेक्षणाला गती द्या; मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठक

या सभेत शहराच्या पायाभूत सुविधा आणि विकासकामांशी संबंधित प्रमुख विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून घनकचरा व्यवस्थापनांतर्गत कचरा संकलनासाठी नवीन घंटागाड्या खरेदी करण्यास मंजुरी देण्याबाबत विचारविनिमय होणार आहे.

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात नगरपरिषद हद्दीत हाती घ्यावयाच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देणे, सण-उत्सवानिमित्त लागणारे विविध स्टॉल स्थलांतरित करणे, वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याबाबत नगरपालिका शिक्षण मंडळाच्या टिप्पणीवर निर्णय घेतला जाणार आहे.

Shrirampur water supply scheme
Rahuri Farmers Electricity Problem: सिंगल फेज बंद, बळीराजा हतबल; राहुरीतील उंबरेसह अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत

केंद्र शासन पुरस्कृत 'अमृत २.०' अंतर्गत सुरू असलेल्या सुधारित शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामास मुदतवाढ देणे व अंदाजपत्रकीय परिमाणात बदल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास मान्यता देणे.

याशिवाय मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, स्थायी व विषय समित्यांच्या शिफारशी, शासकीय पत्रव्यवहार आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणाऱ्या ऐनवेळच्या विषयांवर या सभेत चर्चा होणार आहे.

तलावांच्या नामकरणाबाबत होणार निर्णय

नगरपरिषदेच्या जुन्या साठवण तलावाला 'अनिल सागर' तर, नव्या साठवण तलावाला 'जयंत सागर' असे नामकरण करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.