Tajanapur Lift Irrigation Scheme: ‘ताजनापूर’टप्पा तीनच्या सर्वेक्षणाला गती द्या; मोनिका राजळे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत बैठक

शेवगाव-पाथर्डीच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांची जलसंपदामंत्र्यांकडे मागणी
Tajanapur Lift Irrigation Scheme
Tajanapur Lift Irrigation SchemePudhari
Published on: 
Updated on: 

शेवगाव: शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी प्रस्तावित ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा ३ च्या सर्वेक्षणाला तातडीने सुरुवात करावी, तसेच जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रलंबित कामांना गती द्यावी, यासाठी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

शेवगाव येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी विभागांतर्गत कामांसंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २६ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली.

Tajanapur Lift Irrigation Scheme
Rahuri Farmers Electricity Problem: सिंगल फेज बंद, बळीराजा हतबल; राहुरीतील उंबरेसह अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत

बैठकीत ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा १ अंतर्गत वरूर–आखेगावसह १३ गावांच्या योजनेसाठी २३९.९३ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच टप्पा १ मधील दहिफळ व अन्य सात गावांच्या योजनेच्या दुरुस्तीसाठी २०.८२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली असून, हे काम तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यांच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी प्रस्तावित ताजनापूर उपसा सिंचन योजना टप्पा ३ च्या सर्वेक्षणास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी ६३.२६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करण्याबाबत बैठकीत आग्रह धरण्यात आला.

Tajanapur Lift Irrigation Scheme
Sugarcane Price Protest: ऊसदराचा तिढा कायम; बेलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अडवले १५ उसाचे ट्रॅक्टर

बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प व समन्वय) जयंत बोरकर, कार्यकारी संचालक जयंत गवळी, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंते जगदीश पाटील, सायली पाटील, स्वप्नील काळे आदी अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.