Pudhari Anniversary: ‘इये संतांचिये नगरी’त ‘पुढारी’चा डंका

वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगरकरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
Pudhari Anniversary
‘इये संतांचिये नगरी’त ‘पुढारी’चा डंका Pudhari
Published on
Updated on

नगर: ‘इये संतांचिये नगरी’ हा विशेषांक प्रसिद्ध करून दैनिक ‘पुढारी’ने अहिल्यानगर जिल्ह्यातील संत-महंतांच्या परंपरेवर प्रकाशझोत टाकत एआय युगातील आताच्या पिढीला मानवतेचा पुरस्कार करणार्‍या वारकरी संप्रदायाची आणि महान भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख करून दिली. हा विशेषांक प्रेरणादायी आणि संग्रही ठेवावा असा असल्याचे गौरवोद्गार काढत मान्यवरांनी ‘पुढारी’वर कौैतुकाचा वर्षाव केला.

निमित्त होते ‘पुढारी’च्या अहिल्यानगर आवृत्तीच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. 29) आयोजित स्नेहमेळाव्याचे. गुलमोहर रोडवरील पारिजात चौकाजवळ असलेल्या कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, सहायक कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यासह अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. (Latest Ahilyanagar News)

Pudhari Anniversary
Jayakwadi Dam: जायकवाडी धरण भरण्याच्या मार्गावर; 93 टीएमसी पाणीसाठा

या वेळी इये संतांचिये नगरी या विशेषांकाचे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बाहेर आभाळात दाटलेले आषाढघन आणि त्यांचा हलका शिडकावा यामुळे आधीच कुंद झालेली हवा अन् सभागृहात येणार्‍या प्रत्येकाच्या हातातील पुष्पगुच्छांच्या गंधाने धुंद झालेले वातावरण, हास्यविनोदाच्या लकेरी आणि रंगलेले गप्पांचे फड.. त्यांना मंद संगीताची साथसंगत... असे भारलेले वातावरण म्हणजे आनंदाची मुक्त उधळणच...

‘पुढारी’चे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे, मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, ‘पुढारी’च्या नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ संदीप रोडे, जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, वितरण व्यवस्थापक वैभव जाधव, सहायक वितरण व्यवस्थापक प्रमोेद गायकवाड, तसेच श्रीरामपूरचे कार्यालयीन अधीक्षक विष्णू वाघ आदींनी पुढारी परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा स्वीकार केला.

Pudhari Anniversary
Ahilyanagar News: 'अवाजवी भाडे आकारणी रद्द करावी'

‘पुढारी’वर प्रेम करणारे, पाठबळ देणारे वाचक, जाहिरातदार, वितरक, तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उत्तरोत्तर वाढत जाणार्‍या संख्येने हा स्नेहमेळावा उत्तरोत्तर रंगत गेला.

वर्धापन दिनानिमित्त ‘पुढारी’ सोमवारपासून (दि. 28) रोज प्रसिद्ध करीत असलेल्या ‘इये संतांचिये नगरी’ या विशेषांकाचे मुक्तकंठाने कौतुक करत, शुभेच्छा देण्यातही कुणीच मागे नव्हते. भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते, अ‍ॅड. अभय आगरकर, सचिन पारखी, निखिल वारे, माजी जि. प. सदस्य सचिन जगताप, माजी महापौर दीप चव्हाण, माजी उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख सचिन जाधव, कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. सुभाष लांडे, माजी नगरसेवक अमोल गाढे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डी. आर. शेंडगे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे व डॉ. संजय कळमकर, अडसूळ एज्युकेशनचे अनिरुद्ध अडसूळ, रेणुकामाता मल्टिस्टेटचे प्रशांत भालेराव, साईआदर्शचे शिवाजीराव कपाळे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news