Pravara River Illegal Dams: प्रवरा नदीतील १९ अनधिकृत बंधारे हटवा; अन्यथा दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; बंधारे हटवल्यास दोन टीएमसी पाण्याची बचत होण्याचा दावा
Pravara River
Pravara RiverPudhari
Published on: 
Updated on: 

श्रीरामपूर: निळवंडे धरण ते ओझर बंधारा दरम्यान प्रवरा नदीपात्रात उभारण्यात आलेले किमान १९ अनधिकृत प्रोफाइल वॉल्स तातडीने हटवावेत, नदीपात्रातील विहिरी बुजवून उपसा सिंचन योजना बंद कराव्यात, अशी मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, येत्या आठवड्यांत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास दिवाळीच्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

Pravara River
Ahilyanagar Garbage Collection: लाखो रुपये खर्चून घरांना लावलेले क्यूआर कोड कुचकामी! अहिल्यानगरमध्ये घंटागाडीच्या ट्रॅकिंगचा बोजवारा

दि. ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीतील चर्चेनंतर समितीने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. प्रवरा नदी ही अधिसूचित कालवा असल्याने त्यातील पाणी अडविणारे बंधारे अनधिकृत आहेत. या बंधाऱ्यांमुळे भंडारदरा धरणाच्या सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

Pravara River
Ahilyanagar Water Scarcity: नगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट! २४९ गावे, १ हजार ५८८ वाड्यांना टँकरचा आधार

त्यामुळेच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हे बंधारे हटविण्याचे आदेश दिला होता, असा दावा समितीने केला आहे. समितीचे अध्यक्ष सुरेश ताकेपाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत.

Pravara River
Ram Shinde District Bank Election: विखे, गडाख, थोरात एकत्र आले; मला बाजूला ठेवण्याचे प्रयत्न झाले, राम शिंदेंचा गौप्यस्फोट

..तर दोन टीएमसी पाण्याची बचत होईल!

दि. १ डिसेंबरच्या सिंचन आवर्तनापूर्वी अडथळे हटविल्यास दोन आवर्तनात सुमारे दोन टीएमसी पाणी वाचून पिण्याच्या पाण्याची सहा आवर्तने देता येतील, असा समितीचा दावा आहे. तसेच गावांची तळी दोनदा भरून देणे, सिंचन थकबाकी माफ करणे आणि पाणी मागणी व शुल्क भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.