Pathardi ST Bus Accident: पाथर्डी येथे एसटी बसचा भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी

वृद्धेश्वर कारखान्याजवळ बस उलटली; दोन प्रवासी गंभीर, स्थानिकांनी केली तातडीची मदत
Pathardi ST Bus Accident
Pathardi ST Bus AccidentPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: तालुक्यातील वृद्धेश्वर साखर कारखान्याजवळ मंगळवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास शेवगाव आगाराच्या एसटी बसचा भीषण अपघात होऊन 15 प्रवासी जखमी झाले. यामध्ये दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Pathardi ST Bus Accident
Ahilyanagar Waste Management Inspection: अहिल्यानगरमध्ये 100 कोटींच्या घनकचरा प्रकल्पांची केंद्राकडून तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, शेवगाव आगाराची एसटी बस (एमएच 14 बीटी 4126) 52 प्रवाशांना घेऊन शेवगावहून अहिल्यानगरकडे जात होती. शेवगाव-तिसगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखान्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा झाला.

Pathardi ST Bus Accident
Ahilyanagar MLC Election Candidates Assets: विधान परिषद निवडणुकीत दत्तात्रय पानसरे ठरले सर्वांत श्रीमंत उमेदवार; 17 कोटींची संपत्ती जाहीर

अपघातानंतर बसमधून डिझेल गळू लागल्याने धोका निर्माण झाला होता. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. काही प्रवाशांनी बसच्या खिडक्यांमधून उड्या मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर वृद्ध, महिला आणि इतर अडकलेल्या प्रवाशांना नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Pathardi ST Bus Accident
Ahilyanagar Sugar Factory Elections: साखर कारखाना निवडणुकांची रणधुमाळी; गडाख, राजळे, घुले-लंघे गटांच्या हालचालींना वेग

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले. रंगनाथ चितळे, राजेंद्र तुपे, गणेश काकडे, अनिल राजळे, वृषिकेश शिरसाठ, नवनाथ तिजोरे, संतोष वाघमारे, अक्षय फुलारी, अक्षय पवार, सिमोन तिजोरी, स्वप्निल चितळे, अभिजीत शेळके, मच्छिंद्र म्हसके, पप्पू बनकर, संतोष शेळके, गणेश वेताळ, पप्पू लेंडगुळे, पवार सर, गणेश पवळे, नवनाथ पवार, संदीप काकडे यांनी बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Pathardi ST Bus Accident
Zilla Parishad Power Outage: जिल्हा परिषद कार्यालयात साडेतीन तास वीज गायब; ‘मिनी मंत्रालय’ची बॅकअप यंत्रणा उघडी पडली

त्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकांद्वारे तिसगाव, पाथर्डी आणि शेवगाव येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत तपास सुरू असून या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news