Pathardi Panchayat Samiti Inspection: पाथर्डी पंचायत समितीत सीईओंची झाडाझडती; गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

अस्वच्छता, लेटलतीफ कर्मचारी आणि दिरंगाईवर सीईओ आनंद भंडारी संतप्त; तीन कर्मचाऱ्यांना विना पगारी करण्याच्या सूचना
Pathardi Panchayat Samiti Inspection
Pathardi Panchayat Samiti InspectionPudhari
Published on
Updated on

पाथर्डी : पाथर्डी पंचायत समितीच्या कामकाजात शिस्तीचा अभाव, अस्वच्छता आणि जनतेच्या कामातील दिरंगाई यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी गुरुवारी पंचायत समितीच्या कामकाजाची झाडाझडती घेतली. यावेळी गैरहजर असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना विना पगारी करण्याच्या सूचना केल्या. लेटलतिफ कर्मचाऱ्यांंना शोकॉज नोटीस देण्याचा इशाराही भंडारी यांनी दिला.

Pathardi Panchayat Samiti Inspection
Nepti Water Dispute: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून नेप्तीत दोन गटांत राडा

गुरुवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजता भंडारी यांनी अचनाक पाथर्डी पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. त्यांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची अक्षरशः धावपळ उडाली. कार्यालय परिसरातील अस्वच्छता, अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि लेटलतिफ कर्मचारी याबाबत त्यांनी गटविकास अधिकारी संगीता पालवे यांच्याकडून माहिती घेतली.

भंडारी दाखल होताच कर्मचाऱ्यांनी घाईघाईने स्वच्छता मोहीम सुरू केल्याचेही चित्र पाहायला मिळाले. अस्ताव्यस्त पडलेले साहित्य उचलण्याचे काम सुरू झाले. भंडारी यांनी सर्व विभागप्रमुखांची स्वतंत्र बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेतला. यात रोजगार हमी योजना, बांधकाम विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, सामान्य प्रशासन, तसेच विविध लोककल्याणकारी योजनांच्या कामकाजाची माहिती घेतली. रोजगार हमी योजनेच्या कामकाजासंदर्भातील संपूर्ण दप्तर तपासणी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pathardi Panchayat Samiti Inspection
Kopargaon Administration Initiative: ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रम यशस्वी; कोपरगावात 75 शेतरस्ते वाद निकाली

पंचायत समितीचे काम असमाधानकारक ससल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सर्व विभागप्रमुखांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बायोमेट्रिक तपासणीद्वारे उशिरा येणाऱ्या व गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कार्यालय परिसरातील अस्वच्छतेवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता होत नसल्याबद्दल त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना फटकारले. यापुढे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्यास सफाई कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. बदली झालेल्या ग्रामसेवकांनी तत्काळ नवीन ठिकाणी रुजू व्हावे, अपूर्ण पदभार असल्यास पंचनामा करून संपूर्ण पदभार पुढील ग्रामसेवकाकडे सुपूर्द करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी पाथर्डी शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळांवर नगरपरिषदेकडून घरपट्टी आकारली जात असल्याबाबतही भंडारी यांनी नाराजी व्यक्त करून नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांच्याशी संपर्क केली.

Pathardi Panchayat Samiti Inspection
ZP Budget 2026-27: अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर

स्वच्छतेवरून भंडारी संतप्त

पंचायत समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नियमित स्वच्छता होत नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या निदर्शनास आली. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला.

अधिकारी सीईओंच्या रडारवर

काही अधिकाऱ्यांचे कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यांचे लक्ष कामापेक्षा मलिदा खाण्याकडे अधिक असल्याची गंभीर दखल घेतली गेली आहे. नियमित कामात हलगर्जीपणा करणारे व जबाबदाऱ्या पार पाडण्यात कसूर करणारे काही अधिकारी व कर्मचारी सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या रडारवर आले आहेत.

Pathardi Panchayat Samiti Inspection
Dry Fruit Price Rise: आखाती युद्धाचा परिणाम! रमजानमध्ये अंजीर-खजूर महाग

घरकुल प्रकरणी अधिकाऱ्यांना सूचना

तालुक्यातील शेकटे येथील नितीन बाबासाहेब घुले यांनी घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे अनुदान मिळावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधला; मात्र अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार करण्यात आली. याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घरकुलाची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्याचे कडक शब्दांत दूरध्वनीद्वारे आदेश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news