Nepti Water Dispute: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून नेप्तीत दोन गटांत राडा

वादातून एका कुटुंबाला मारहाण; नगर तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
दोन गटांत राडा
दोन गटांत राडाPudhari
Published on
Updated on

नगर : सामायिक विहिरीचे पाणी उपसण्याच्या कारणावरून नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे दोन गटांत जोरदार राडा झाला. एका कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना 10 मार्च रोजी घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दोन गटांत राडा
Kopargaon Administration Initiative: ‘बांधावरच न्यायनिवाडा’ उपक्रम यशस्वी; कोपरगावात 75 शेतरस्ते वाद निकाली

संजय केरू राऊत, स्वराज संजय राऊत, वैशाली संजय राऊत (सर्व रा. नेप्ती, ता. जि. अहिल्यानगर) असे संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत विशाल आण्णा राऊत रा. नेप्ती यांनी पोलिस फिर्याद दिली.

दोन गटांत राडा
ZP Budget 2026-27: अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आज सादर

विशाल राऊत व संजय राऊत यांची समाईक विहीर आहे. तू आमच्या विहिरीचे पाणी उपसायचे नाही आणि विहिरीवर यायचे नाही, असे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत घाले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या पत्नीला आणि आई-वडिलांनाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार जंबे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news