

पाथर्डी: पाथर्डी नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांच्या निवडी सोमवारी (दि. 19) बिनविरोध पार पडल्या. बांधकाम समितीच्या सभापति पदी ज्येष्ठ नगरसेवक नंदकुमार उर्फ बाबूराव शेळके, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून विजयी झालेल्या व भाजपच्या सहयोगी सदस्य असलेल्या वंदना टेके यांची महिला बालकल्याणच्या सभापतिपदी वर्णी लागली.
सोमवारी सकाळी पालिका सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी सहायक म्हणून काम पहिले.
निवड झालेल्या समित्यांच्या सभापती व सदस्य असे:
स्थायी समिती: नगराध्यक्ष अभय आव्हाड सभापती, तर सदस्य म्हणून बाबूराव शेळके, विठ्ठल बोरुडे, मंगल कोकाटे, वंदना टेके, तसेच बजरंग घोडके व डॉ शारदा गर्जे. बांधकाम समितीच्या सभापतिपदी नंदकुमार उर्फ बाबुराव शेळके यांची, तर सदस्य म्हणून सुभाष बोरुडे, संजय देशमुख, प्रतीक नांगरे व सविता भापकर.
आरोग्य समितीच्या सभापतिपदी बंडूशेठ उर्फ विठ्ठल बोरुडे, तर सदस्य म्हणून जगदीश मुने, अमोल गर्जे, मनीषा उदमले व देवीदास पवार.
पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदसिद्ध उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, तर सदस्य म्हणून संजय देशमुख, सुभाष बोरुडे, किरण खेडकर व मंगल सोनटक्के.
महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी वंदना टेके यांची निवड झाली. सदस्य म्हणून वर्षा मोरे, ज्योती पवार, मनीषा उदमले व रेखा हंडाळ यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर आमदार मोनिका राजळे यांनी पालिका सभागृहात येऊन सभापतींचे अभिनंदन करीत त्यांना त्यांच्या खुर्चीवर सन्मानाने विराजमान केले.
या वेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड व नगरसेवक उपस्थित होते. विषय समित्यांच्या बैठकीसाठी नगरसेविका दीपाली बंग, सविता भापकर व स्वीकृत सदस्य संजय भागवत हे गैरहजर होते.