Jeur Daytime Power Supply: जेऊर पंचक्रोशीत शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू

बिबटप्रवण क्षेत्रात रात्रीच्या विजेमुळे अडचणी; अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांना दिलासा
Power Supply
Power SupplyPudhari
Published on
Updated on

नगर तालुका: जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती.

Power Supply
Nevasa Sugarcane Transport: धोकादायक ऊस वाहतूक वाढली, आरटीओ विभाग साखरझोपेत?

बिबट प्रवण क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्याचा निर्णय प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे दोन महिने तालुक्यातील बहुतांशी भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत होता. जेऊर परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन, तसेच पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटना घडलेल्या होत्या. तसेच बिबट्याचा वावर मानव वस्तीत आढळून येत असल्याने महावितरणच्या जेऊर उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या गावांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता.

Power Supply
Sangamner Municipal Committee Election: संगमनेर नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड बिनविरोध

महावितरणतर्फे मागील आठवड्यात विजेच्या वेळापत्रकात बदल करून शेतकऱ्यांसाठी पुन्हा रात्री वीज पुरवठा सुरू केला होता. सद्यःस्थितीत रब्बी हंगामातील गहू, हरभरा, गावरान कांदा, लसूण, चारा पिके अशा सर्वच पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे.

Power Supply
Karjat ZP School Vandalism: ढेरे मळा येथील झेडपी शाळेची तोडफोड, विद्यार्थ्यांमध्ये भीती व संताप

पाणी उपलब्ध असूनही रात्रीच्या विजेमुळे शेतकरी वर्गामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी भीतीचे वातावरण तयार झाले होते. याबाबत जेऊर, डोंगरगण, पिंपळगाव, मांजरसुंबा, बहिरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षय कर्डिले यांची भेट घेऊन दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याबाबत मागणी केली होती.

Power Supply
Ahilyanagar Gram Panchayat Fund: ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर ‘बंधित’ निधीचा पाऊस

रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या लक्षात घेऊन अक्षय कर्डिले यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. शेतकऱ्यांना तत्काळ दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात यावा यासाठी सूचना दिल्या. त्यानुसार महावितरणतर्फे रविवार (दि. 18)पासून जेऊर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दिवसा वीजपुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी कर्डिले यांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news