Pathardi Child Marriage: पाथर्डीत बालविवाहाचे धक्कादायक वास्तव; चार अल्पवयीन मुली गर्भवती

आरोग्य तपासणीदरम्यान प्रकार उघड; कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणीत विसंगती, पोलिसांकडून चौकशी सुरू
Child Marriage
Child MarriagePudhari
Published on: 
Updated on: 

पाथर्डी: तालुक्यात बालविवाहाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह झाल्याने चार अल्पवयीन मुली गर्भवती झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील नियमित आरोग्य तपासणीदरम्यान उघडकीस आली. या मुली शहरासह तालुक्यातील तीन गावांमधील प्रत्येकी एक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बालविवाह प्रतिबंधासाठी कार्यरत असलेल्या ग्रामस्तरीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Child Marriage
Ahilyanagar District Bank Election: थोरात-विखे एकत्र; जिल्हा बँकेसाठी ऐतिहासिक समझोता

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने दर शनिवारी गरोदर मातांची नियमित तपासणी केली जाते. त्यानुसार शनिवारी झालेल्या तपासणीदरम्यान काही गर्भवतींच्या वयाबाबत संशय निर्माण झाला. कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली असता, चार गर्भवती १८ वर्षांखालील असल्याचे समोर आले.

Child Marriage
Fake Paneer Ban: बनावट पनीरवर देशभरात निर्बंधाची तयारी; ‘पनीर’ नाव वापरण्यावरही बंदीचा प्रस्ताव

यातील एका अल्पवयीन गर्भवतीने आपले वय लपविण्याचा प्रयत्न केला. तिने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आधार कार्ड सादर केले. मात्र, कागदपत्रे आणि वैद्यकीय तपासणीतील माहितीमध्ये विसंगती आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दुसऱ्या एका गर्भवतीचे आधार कार्डवर वय १८ वर्षे दिसत असले, तरी ती गर्भवती राहिली, त्या वेळी तिचे वय अवघे १७ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. अशाच स्वरूपाची माहिती अन्य दोन प्रकरणांतही पुढे आली आहे.

Child Marriage
Ahilyanagar Crime: टेम्पो मागे घेण्यावरून वाद; तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

चारही प्रकरणांची माहिती समोर आल्यानंतर उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने सविस्तर अहवाल पोलिस प्रशासनाकडे पाठविल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सचिन दरंदले यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली आहे. या बालविवाहांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विवाह नेमके कधी व कोठे झाले, विवाहाच्या वेळी मुलींचे वय किती होते, तसेच विवाहासाठी कोणाची भूमिका होती, याची माहिती पोलिस घेत आहेत.

Child Marriage
Ahilyanagar 33 Roads Development: अहिल्यानगरमध्ये ३३ रस्त्यांचा विकास; ३०० कोटींचा प्रस्ताव

याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर यांच्याकडे देण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांनी सांगितले. यातील ज्या मुलीने आधार कार्डच्या माध्यमातून वय लपविण्याचा प्रयत्न केला, तिच्या कागदपत्रांचीही पडताळणी केली जाणार आहे. अल्पवयीन मुलींचे विवाह लपविण्यासाठी कागदपत्रांमध्ये फेरफार अथवा चुकीची माहिती देण्यात आली का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news