Ahilyanagar Crime: टेम्पो मागे घेण्यावरून वाद; तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

भांडण सोडविण्यास आलेल्या आईला मारहाण; दोन तोळ्यांची सोनसाखळी लांबविली
Crime News
Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

नगर: भाजी मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या प्रेशर पंपाच्या दुकानासमोर टेम्पो मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईला मारहाण करून गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची साखळी लांबविली.

Crime News
Ahilyanagar 33 Roads Development: अहिल्यानगरमध्ये ३३ रस्त्यांचा विकास; ३०० कोटींचा प्रस्ताव

ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमोल सानप (रा. सारसनगर, अहिल्यानगर) व त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News
Ahilyanagar Dry Drought: अहिल्यानगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर; खरीप पिकांना मोठा फटका

याबाबत तुषार पांडुरंग भागानगरे (वय ३२, रा. पंचपीर चावडी, माळीवाडा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी भाजी मार्केट यार्ड परिसरात होते. त्यावेळी आरोपी अमोल सानप हा टेम्पो रस्त्यावरून मागे (रिव्हर्स) घेत होता. "टेम्पो मागे घेताना व्यवस्थित पाहून घ्या," असे तुषार यांनी सांगितल्याचा राग धरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

Crime News
Matoshri Vruddhashram Attack: मातोश्री वृद्धाश्रमात रक्तरंजित हल्ला; दोघांचा मृत्यू, सहा जखमी

त्यानंतर आरोपी अमोल सानप याने टेम्पोमधून लोखंडी गज काढून तुषार यांच्या हातावर, छातीवर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी तुषार यांची आई मध्यस्थी करायला आली असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करून दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी हिसकावून घेतली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news