Rahata Female Fetus Abortion: राहाता तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या; कडक कारवाईची मागणी

डॉ. राजेंद्र पिपाडा आणि आमदार प्रशांत बंब यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली
Female Fetus Abortion
Female Fetus AbortionPudhari
Published on
Updated on

एकरूखे: गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या करण्यासाठी राज्यभरातून लोक राहाता येथे येत असल्याची शरमेची बाब आहे. हे प्रकार संतापजनक असल्याचे सांगत या प्रकरणातील संबंधित डॉक्टर व केंद्रांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.

Female Fetus Abortion
Ahilyanagar Open Science Park: अहिल्यनगर ‘ओपन सायन्स पार्क’ योजना अडथळ्यात; निधी इतर कामांसाठी वापरला

यावेळी डॉ. पिपाडा यांनी राहाता तालुक्यात काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकारामुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात असून मुलगी जन्माला येण्याआधीच तिचे अस्तित्व संपविण्याचा हा अमानुष प्रकार थांबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Female Fetus Abortion
Shrirampur Toxic Powder: श्रीरामपूरमध्ये विषारी पावडर फवारणी; पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू

तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे राहाता शहरासह शिर्डी मतदारसंघाची बदनामी होत असून प्रशासनाने तत्काळ विशेष पथक नेमून संबंधित रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रे व डॉक्टरांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. पिपाडा यांनी केली. डॉ. पिपाडा म्हणाले, समाजातील मुलींचे प्रमाण टिकविणे व स्त्री भ्रूणहत्या रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अशा बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही.

Female Fetus Abortion
Ahilyanagar Ward 17 Water Shortage: अहिल्यनगर प्रभाग 17 मध्ये कृत्रिम पाणीटंचाई; नागरिकांच आयुक्तांकडे निवेदन

समाजातील स्त्री भ्रूणहत्या व गर्भलिंग निदानासारख्या अमानुष प्रथांविरोधात कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या विषयावर पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आवश्यक ती पाठपुरावा कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Female Fetus Abortion
Ahilyanagar Standing Committee Chairman: नगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी सुभाष लोंढे बिनविरोध

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला चौकशीचे निर्देश देऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

आ. बंब यांनीही सभागृह गाजवलं!

राज्यभर सुरू असलेल्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या या प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनीही विधानसभेत बोलताना हा एक प्रकारचा जन्माला येणाऱ्या बाळाचा खून असून संबंधित डॉक्टरांवर खूनाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे असल्याचे सभागृहात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news