Pathardi Chain Snatching Crime: पाथर्डीत ‘धूम स्टाईल’ चोरांचा धुमाकूळ; भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण लंपास

आनंदनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या तिघांची कारवाई; हिसका बसल्याने महिला रस्त्यावर कोसळल्या, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू
Pathardi Chain Snatching
Pathardi Chain SnatchingPudhari
Published on
Updated on

पाथर्डी: शहरातील आनंदनगर परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११) सायंकाळी घडली. यात हिसका बसल्याने संबंधित महिला रस्त्यावर कोसळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंदनगर येथील संगीता सुधाकर पाखरे (वय ५३) या मैत्रीण अर्चना खेडकर यांच्यासह पायी जात होत्या. सायंकाळी ६.१५ वाजता शेवगाव रस्त्यावरील अर्जुन बाबा मंदिराजवळून आनंदनगरकडे जात असताना स्पोर्ट्स दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला.

Pathardi Chain Snatching
Shevgaon Voter List Revision: शेवगावात मतदार यादी विशेष पुनर्रिक्षणाला वेग; १९९ मतदान केंद्रांवर बीएलओंच्या घरभेटी सुरू

योग्य संधी साधून मागे बसलेल्या दोघांपैकी एकाने संगीता पाखरे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळे वजनाचे मिनी गंठण जोराने हिसकावले. अचानक झालेल्या या प्रकारात तोल जाऊन पाखरे या रस्त्यावर पडल्या. अर्चना खेडकर यांनी आरडाओरडा केला; मात्र आरोपी क्षणार्धात भरधाव वेगाने पसार झाले. या घटनेत दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्यामध्ये तिन्ही संशयित कैद झाल्याची माहिती मिळाली आहे. फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

Pathardi Chain Snatching
Hospital Pharmacy Medicine Purchase Rules: खासगी रुग्णालयांची औषधांवरील सक्ती बंद! आता रुग्णांना कोणत्याही मेडिकलमधून औषधे खरेदीचा अधिकार

याप्रकरणी संगीता सुधाकर पाखरे यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, आनंदनगर परिसरात यापूर्वीही सोन्याचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी यांना लुटल्याची घटना तीन वर्षापूर्वी घडली होती.त्यानंतर पुन्हा भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

Pathardi Chain Snatching
Shrirampur Crime Crackdown: श्रीरामपूरातील गुन्हेगारीचा महिनाभरात बीमोड; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा

शहरात दुचाकीवरून येत नागरिकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याच्या 'धूम स्टाईल' चोऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये शेवगाव रस्त्यावरील एका व्यापाऱ्याच्या दुकानात ग्राहक म्हणून घुसून साडेतीन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून नेण्यात आली होती. त्यानंतर साईनाथनगर परिसरातील घरासमोर असलेल्या एका महिला व्यापाऱ्याच्या गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न झाला होता.

Pathardi Chain Snatching
Nivruttinath Dnyaneshwari Palkhi Bandhubhet: अहिल्यानगरीत ‘बंधूभेटी’चा अविस्मरणीय क्षण; निवृत्तीनाथ-ज्ञानेश्वरी पालख्या एकत्र, विठ्ठलनामाचा गजर

काही दिवसांतच त्याच परिसरातील आणखी एका व्यापाऱ्याच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली होती. आता आनंदनगर परिसरात पुन्हा अशाच पद्धतीने एक लाख रुपये किमतीचे मिनी गंठण लुटण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या मालिकेतील बहुतांश गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने धूमस्टाईल चोरट्यांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news