Parner Credit Society Profit: पारनेर पतसंस्थेची भरारी; 5.32 कोटींचा नफा, ठेवी 251 कोटींवर

17 शाखांमधून सेवा विस्तार; सभासदांच्या विश्वासावर आर्थिक प्रगती
Growth
GrowthPudhari
Published on
Updated on

पारनेर: पारनेर ग्रामीण पतसंस्थेला सन 2025-2026 या आर्थिक वर्षात 5 कोटी 32 लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा आमदार काशिनाथ दाते यांनी दिली.

Growth
Shrirampur Law And Order: श्रीरामपूरमध्ये तणाव वाढला; आमदारांचा पोलिसांना इशारा

संस्थेच्या ठेवी मार्च 2026अखेर 251 कोटी 82 लाख रुपयांच्या आहेत. संस्थेचे खेळते भांडवल 295 कोटी 52 लाख असून, वसूल भागभांडवल 6 कोटी 54 लाख, राखीव व इतर निधी 29 कोटी 83 लाख आहे. संस्थेचे कर्जवाटप 175 कोटी 29 लाख असून, बँक शिल्लक व गुंतवणूक रुपये 106 कोटी 99 लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल रुपये 2480 कोटींची झालेली आहे. संस्थेने 23 वर्षाच्या कालावधीत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, जामगाव, कामोठे (नवी मुंबई) खडकवाडी, आळेफाटा, सुपा व शिरूर येथे स्वमालकीच्या प्रशस्त व अद्ययावत इमारती आहेत.

Growth
Ahilyanagar Jal Jeevan Yojana: जलजीवन योजनेत गोंधळ; 918 कोटी खर्चूनही हस्तांतरणावर प्रश्नचिन्ह

पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, बेलवंडी फाटा, जामगाव, नारायणगव्हाण, आळेफाटा ता. जुन्नर, सुपा, कामोठे (नवी मुंबई), वनकुटे, अहिल्यानगर, ढवळपुरी, भोसरी, खडकवाडी, मांडवे खुर्द, पळशी व शिरूर अशा 17 शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे कार्यक्षेत्र अहिल्यानगर, पुणे, ठाणे व मुंबई आहे. संस्थेमार्फत पारनेर, टाकळी ढोकेश्वर, आळकुटी, जामगाव, ढवळपुरी व बेलवंडी फाटा येथे सभासदांना लॉकर सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

Growth
Maharashtra Unseasonal Rain Crop Loss: अवकाळी पाऊस व गारपीट; श्रीरामपूर-शेवगावमध्ये पिकांचे मोठे नुकसान

संस्थेच्या अद्ययावत कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, एस एम एस सुविधांमुळे ग्राहकांना सर्व माहिती तात्काळ मिळत आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखांमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरक कंपनीचे अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी सुविधा सुरू करण्यात आल्याने ग्राहकांना वीजबिल भरण्यास सुलभ होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी सांगितले.

Growth
Ashok Kharat: शिर्डी जमीन व्यवहार प्रकरणात साक्षीदारांवर चौकशीची मागणी; भोंदू खरात प्रकरण तापले

संस्थेने 23 वर्षाच्या कालावधीत सभासदांच्या विश्वासावर प्रगती केलेली असून, सभासदांना घर बांधणी, व्यवसाय, स्थावर मालमत्ता खरेदीसाठी, वाहन खरेदी तसेच गोरगरीब गरजू घटक, सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, लघुउद्योग, होतकरू कामगारांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती करता यावी यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.

सुरेश बोरुडे, उपाध्यक्ष, पारनेर पतसंस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news