Ahilyanagar Crime : धक्कादायक ! वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला पट्ट्याने केली बेदम मारहाण

मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला
Ahilyanagar crime news
आठवीतील विद्यार्थ्याला पट्ट्याने केली मारहाण pudhari
Published on
Updated on

Ahilyanagar crime news : जामखेड : अहिल्यानगरच्या जामखेड येथील निवासी वसतिगृहातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. वस्तीगृहातील नववीच्या मुलांनी आठवीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

जामखेडच्या अनुसूचित जाती जमाती, नवबौद्ध मुलांच्या निवासी विद्यालयातील हा प्रकार घडला आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला रिंगण करून बेल्टने मारहाण करण्यात आली. या घटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Ahilyanagar crime news
Ahilyanagar crime : हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जखमीला टाकून दोघांनी काढला पळ; जखमी व्यक्तीचाही मृत्यू

शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांना मारहाण झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दि. २१ रोजची घटना आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अहिल्यानगर प्रविण कोरगंट्टीवार आले असून पोलीस निरीक्षक महेश पाटील व मारहाण झालेल्या व मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आईवडिल यांची संयुक्त बैठक सुरू आहे. कोरगंट्टीवार यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली असून ते चौकशी करून संध्याकाळ पर्यंत अहवाल देणार आहेत.

Ahilyanagar crime news
Pahalgam Terror Attack Victim Pune |कौस्तुभ गनबोटे यांच्या अंत्यदर्शनासाठी शरद पवार उपस्थित; पाहा विदारक क्षणचित्रे

मुले अल्पवयीन असल्याने सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न कालच झाला होता. परंतु व्हिडीओ व्हायरल झाला त्यामुळे प्रशासन दखल घ्यावी लागली. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काढून टाका व कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी याबाबत सहायक आयुक्त कोगट्टीवार म्हणाले संध्याकाळ पर्यंत अहवाल येईल त्यानंतर कारवाई बाबत माहिती मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news