

नगर : जिल्हा रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये रविवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या दोघांनी एका जखमीला टाकून पळून गेले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाच्या वरांड्यामध्ये सोमवारी पहाटे दोन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवर एका 38 वर्षीय अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत टाकून पळ काढला. काही वेळात ही बाब तेथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आली. त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्यांना सांगितले. कर्मचार्यांनी त्या व्यक्तीला उपचारासाठी आतमध्ये नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. के. कुलकर्णी यांनी त्यास तपासले असता तो व्यक्ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे समोर आले. ही बाब त्यांनी पोलिस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांना सांगितली. तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या टीबी वॉर्डच्या पार्किंगमध्येही रविवारी (दि. 20) दुपारी एक अंदाजे 60 वर्षीय अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला. त्यास रुग्णालयात दाखल करून वैद्यकीय अधिकार्यांनी उपचारापूर्वीच मयत घोषीत केले. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.