Nagar Panchayat Samiti Election: महिला सभापतिपदाची हॅट्‌‍ट्रिक

नगर तालुका पंचायत समिती; अनेकांचा हिरमोड
Nagar Panchayat Samiti Election
महिला सभापतिपदाची हॅट्‌‍ट्रिकPudhari
Published on
Updated on

शशिकांत पवार

नगर तालुका : मिनी आमदारकी समजली जाणाऱ्या नगर तालुका पंचायत समिती सभापतीची धुरा सलग तिसऱ्यांदा महिलेच्या हातात गेल्याने सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी करत असणाऱ्या पुरुष मंडळींचा हिरमोड झाला आहे.(Latest Ahilyanagar News)

Nagar Panchayat Samiti Election
Parner municipal election: पारनेरमध्ये खासदारांसमोर महायुतीचे आव्हान

मात्र, आता स्वतःऐवजी सौभाग्यवतींना रिंगणात उतरवण्याची वेळ मातब्बरांवर येणार आहे. नगर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले असून, याआधीही पंचायत समितीची धुरा सर्वसाधारण महिलेच्याच हातात होती. आताही सभापतिपद सलग तिसऱ्यांदा महिलेच्या हाती येणार असल्याने सभापतिपदाचे स्वप्न पाहत तयारी करीत असणाऱ्या नेत्यांचा हिरमोड झाला आहे.

Nagar Panchayat Samiti Election
Shevgaon municipal election 2025: शेवगाव नगरपरिषदेत घुले-राजळे यांच्यात रंगणार सत्तासंघर्ष

गेल्या 19 वर्षांत नगर तालुका पंचायत समितीमध्ये नंदा शेंडगे, नलिनी पाखरे, कांताबाई कोकाटे, सुरेखा गुंड या महिलांनी सभापतिपदाची धुरा सांभाळली. नगर तालुका पंचायत समितीत गेल्या 19 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्याने शिवसेना दुभंगली आहे. आ. शिवाजी कर्डिले यांचे तालुक्यात राजकीच वर्चस्व वाढले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा महाआघाडी रिंगणात उतरणार असली, तरी भाजप स्वतंत्र लढणार की मित्र पक्षांशी युती करणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Nagar Panchayat Samiti Election
Karjat municipal election:‌‘सौं‌’साठी पतिराजाची प्रतिष्ठा पणाला

गेली तीन टर्म पंचायत समितीची सत्ता आ. कर्डिले यांच्या विरोधकांकडे आहे. यंदा ती सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी भाजप ताकदीने मैदानात उतरणार असल्याने नगर तालुक्यात तुल्यबळ लढती होतील. त्यातच सर्वांचा डोळा सभापतिपदावर असणार आहे. त्यासाठी योग्य महिला निवडून येण्यावर सर्वाचा भर असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news